Tue, Nov 13, 2018 06:17होमपेज › Konkan › मृतांच्या वारसांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू

मृतांच्या वारसांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू

Published On: Jul 31 2018 2:01AM | Last Updated: Jul 31 2018 1:55AMदापोली : प्रतिनिधी

मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेली प्रत्येकी 4 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. कोकण कृषी विद्यापीठाचे तीस कर्मचारी आंबेनळी घाटातील अपघातात मृत झाले. त्यातील काही मृतांच्या नातेवाईकांना सोमवारी सायंकाळी महसूल प्रशासन आणि कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून घरी जाऊन धनादेश देण्यात आले.

पालकमंत्री ना. वायकर यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. हर्णे येथील किशोर चौगले, रोशन तबीब व जयंत चोगले यांच्या कुटुंबीयांनाही प्रांताधिकारी जयराम देशपांडे, तहसीलदार कविता जाधव यांच्याकडून 4 लाख रुपयांचा धनादेश देण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.दापोली तालुक्यातील खेर्डी येथील सुनील कदम यांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीचा चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. हेमंत सुर्वे तुळसणी (ता. संगमेश्‍वर), राजाराम गावडे  (वेंगुर्ले, जि.सिंधुदुर्ग) विनायक सावंत (कासार्डे, जि.सिंधुदुर्ग), प्रमोद जाधव (मंडणगड) या मृतांच्या नातेवाईकांना मदतीचा धनादेश देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून कर्मचारी रवाना झाला आहे. लवकरच कृषी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेकडून मृत कर्मचार्‍यांच्या वारसांना आर्थिक मदतीचा धनादेश मंगळवारपर्यंत त्यांच्या घरी जाऊन देण्यात येणार आहे. यातील मृत कर्मचारी यांचे सामूहिक विम्याचे  क्लेम अथवा त्या अनुषंगाने लागणारी माहिती तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून तातडीचे प्रयत्न सुरू आहेत. रया अपघातातील मृत झालेल्या 30 कर्मचार्‍यांच्या वारसांना हा धनादेश सुपुर्द करण्यात येणार आहे.