Tue, Mar 19, 2019 11:41होमपेज › Konkan › पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर नेहमीच अपघाताची टांगती तलवार

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर नेहमीच अपघाताची टांगती तलवार

Published On: Jul 28 2018 7:37PM | Last Updated: Jul 28 2018 7:06PMपोलादपूर : समीर बुटाला, धनराज गोपाळ

देशाच्या मजबुतीसाठी व वाहतुकीच्या निर्मितीसाठी अनेक मार्गांची निर्मिती करण्यात आली. वाहतुकीच्या जाळ्यांचे वेगाने विस्तारिकरण करण्यात आले असून, पोलादपूर-वाई-सुरूर-राज्य मार्गाची निर्मिती अंदाजे १८७१ मध्ये  सुरवात करण्यात आली होती. १८७६ मध्ये सदरचा मार्ग पूर्ण झाला असला तरी कायम कोकण व पश्चिम घाटाला जोडणार्‍या या महत्वपूर्ण मार्गावर अपघाताची टांगती तलवार दिसून आली आहे. सकाळी पावणे अकरा वाजता झालेल्या अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील दहा मृतदेह सायंकाळी सहा वाजता बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली. 

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर सकाळी दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाची बस तालुक्यातील दाभीळटोक या गावाच्या हद्दीत दरीसाईडला सहाशे फुट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात बसमधील ३२ प्रवासी जागीच ठार झाले. तर प्रकाश देसाई-सावंत यांनी बसमधून उडी मारल्याने बचावले आहेत. या अपघाताची माहिती त्यांनी मोबाईलद्वारे कोकण कृषी विद्यापीठाला दिली. यानंतर सर्व शासकीय यंत्रणांना व प्रशासनाला अपघाताची माहिती प्राप्त होताच तसेच घटनेची भीषणता लक्षात घेता दरीमध्ये उतरण्यासाठी सह्याद्री, महाबळेश्वर ट्रेकर्स, सातारा ट्रेकर्स यांसह इतर दोन टीमने ऑपरेशन राबवून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. पावसाची रिमझिम व धुक्यामुळे मदत कार्यात अडथळा येत होता. सायंकाळी उशिरापर्यंत दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये  विक्रांत शिंदे (वय ४३, दापोली), सचिन गीम्हवनेकर (३६ दापोली), निलेश तांबे (३२, चंद्रनगर दापोली), संतोष झगडे (३६ दापोली), राजेंद्र रिसबूड (४६ दापोली), संजू झगडे  (४२ दापोली), प्रशांत भांबीड (३३ जालगाव), रत्नाकर पागडे (३७ चंद्रनगर पगारवाडी), सचिन चंद्रकांत झगडे (गीम्हवने), प्रमोद मोहन शिगवण (वडाचाकोंड दापोली), हे सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. 

घटनास्थळी आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्‍हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर, तालुका प्रमुख निलेश अहिरे, आजी-माजी सर्व पक्षाचे पदाधिकारी यासह वैद्यकीय अधिकारी, यामध्ये गुलाबराव सोनवणे, पाचगणी येथील खासगी हॉस्पिटलसह शासकीय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, महाड विभागीय पोलिस अधिकारी प्रांजली सोनावणे, पोलादपूरचे पो. नि. प्रकाश पवार, महाड शहरचे पंकज गिरी यांच्यासमवेत महाड-पोलादपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, कशेडी महामार्ग पोलिस, महाबळेश्वर पोलिस, मदतग्रुप फौंडेशनचे सदस्य खेड, विविध बचाव पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे.

सायंकाळ उशिरा घटनास्थळी सदाभाऊ खोत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच वैद्यकीय अधिकारी बचाव पथकाशी चर्चा करून या ठिकाणी कोणत्या उपाययोजना राबविण्यात येतील या संदर्भात विचारपूस करून बचाव कार्य वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात मृत व्यक्तींचा नातेवाईकांचा आक्रोश  पहावयास मिळाला. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून, त्यांची राहण्याची व बसण्याची सोय कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात करण्यात आली.

वैद्यकीय अधिकारी गुलाबराव सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता, ३३ प्रवासी असल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगितले. या अपघातात एकच प्रवासी बचावला होता. महाड, पोलादपूर, माणगावसह महाबळेश्वर, पाचगणी येथील वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, १० रुग्णवाहिका याठिकाणी असल्याचे त्यांनी सांगितले.बचावलेले प्रकाश देसाई-सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये प्रवाशांच्या संख्येनुसार बस लहान होती. ड्रायव्हर बाजूच्या सीटवर बसलो असल्याने अपघात घडतेवेळी खिडकीतून उडी मारली. तर बस कोसळतेवेळी बसमधील प्रवासी आजूबाजूला फेकले गेल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दरीतून रस्त्यावर आल्यानंतर संपर्क साधून अपघाताची माहिती त्यांनी दिली. 

Image may contain: 2 people, including Vijayraj Patil, people smiling, people standing and outdoor

Image may contain: 6 people, people smiling, people sitting

Image may contain: 12 people, including Vijayraj Patil and Ajit Chandrakant Kenjale

छाया : निरंजन मोरे, प्रसाद पाटील