Fri, May 24, 2019 09:10होमपेज › Konkan › देश संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र या : चारुदत्त आफळे

देश संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र या : चारुदत्त आफळे

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 15 2018 12:30AM

बुकमार्क करा
चिपळूण : शहर वार्ताहर

आगामी तीन वर्षात जागतिक महायुद्धाचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत देशाला स्थैर्य मिळवून देईल अशा लोकांच्या पाठीशी आपण उभे राहिलो पाहिजे. परकीय आक्रमणांचा सामना करताना पंथभेद विसरुन सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी चिपळुणातील कीर्तनमालेच्या समारोपप्रसंगी केले. 

येथील श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे खेडेकर क्रीडा संकुलात पाच दिवस दशावतारातील श्री कृष्णावतार या विषयावर कीर्तनमाला रंगली. चिपळूणवासीयांनी याला भरभरुन प्रतिसाद दिला. समारोपाच्या दिवशी गोपाळकाला साजरा करण्यात आला. या समारोपाच्या कीर्तनात आफळे म्हणाले, धर्मरक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे.  आपापले जातीभेद, पंथ विसरुन एकसंघ व्हावे. पूर्वरंगात भगवंतांचे औदार्य या विषयावर बोलताना, संतांनी आपल्या नातेवाईकांमध्ये भगवंत पाहिला. या विषयाला धरुनच त्यांनी श्रीकृष्णांचे चरित्र कथन केले.

उत्तररंगात पांडवांच्यावतीने शिष्टाईसाठी भगवान श्रीकृष्ण जातात तो प्रसंग सांगितला. कृष्णाचे आजचे अस्तित्त्व श्रीमद् भागवत व श्री भगवद् गीतेमध्ये आहे. हेच त्याचे स्वरूप आहे. त्यामुळे त्याचे वाचन आणि पठण करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश थत्ते यांनी केले. यावेळी आफळेबुवांच्या रसपूर्ण कथनामध्ये बालकांनी दहीहंडी फोडली आणि काल्याच्या प्रसादानंतर कीर्तनमालेचा समारोप झाला.