Tue, Jul 16, 2019 23:54होमपेज › Konkan › गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील सर्वच खड्डे डांबराने भरणार : देशपांडे

गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील सर्वच खड्डे डांबराने भरणार : देशपांडे

Published On: Jul 28 2018 1:34AM | Last Updated: Jul 27 2018 11:43PMदेवरूख : वार्ताहर

मुंबई - गोवा महामार्गाची सध्या दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे यांची भेट घेऊन चर्चा केली. पावसाचे प्रमाण कमी झाल्यास सर्वच खड्डे डांबराने भरणार असल्याची माहिती यावेळी मुख्य अभियंता विनय देशपांडे यांनी दिली.

महामार्गप्रकरणी लक्ष देऊन गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्‍त करण्याची विनंती येडगे यांनी केली असता गणेशोत्सवापूर्वी मुंबई - गोवा महामार्ग खड्डेमुक्‍त करण्यात येईल, तशा सूचना अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व संबंधित ठेकेदारांना दिल्या असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील कशेडी ते राजापूर दरम्यान कमी अधिक प्रमाणात महामार्गाचे काम करण्यात आले आहे. रस्त्याच्या चौपदरीकरण कामामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. महामार्गावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. काही तांत्रिक कारणांमुळे खड्डे भरण्याचे काम रखडले मात्र, आता यापुढे महामार्गावरील खड्ड्यांप्रकरणी ठेकेदारांची गय केली जाणार नसल्याची माहिती मुख्य अभियंत्यांनी दिली.

पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी डांबर वापरणे शक्य नाही. तरीही  पा ऊस कमी झाल्यास सर्वच खड्डे डांबराने भरले जातील महामार्गावरील प्रवाशांना त्रास होणार नाही, याची दक्षता संबंधित ठेकेदारांनी घ्यावी व प्रवाशांच्या सुरक्षिततेप्रकरणी महामार्गावर ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत, अशा सूचना ही केल्याची माहितीदेशपांडे यांनी दिली.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाची गती चांगली असून डिसेंबर 2019 पर्यंत काम पूर्ण होईल, असा विश्‍वास यावेळी मुख्य अभियंत्यांनी व्यक्‍त केला चौपदरीकरण प्रकल्पातील काही तांत्रिक अडचणी सोडवून चौपदीकरण काम करावे लागत असल्याने अडथळा ठरु पाहणार्‍या अडचणी सुटतील आणि 2019 ला चौपदीकरण काम पूर्ण होईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.