कुडाळ : वार्ताहर
नक्षत्रांच देण काव्यमंच महाराष्ट्रच्या वतीने पाचवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन शनिवार 12 व रविवार 13 मे रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या महासंमेलनाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवार 13 मे रोजी होणार आहे.
महाकाव्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य पद्मश्री मधू मंगेश कर्णिक उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष पालकमंत्री दीपक केसरकर, उद्घाटक प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, साहित्यिक शांताराम कारंडे, डॉ. आनंद वैद्य, संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. डिसले, नागपूरचे सुनीलभाऊ नाथे हे उपस्थित राहणार आहेत.
शनिवार 12 रोजी स. 9 ते 10 वा जिजामाता चौक ते कार्यक्रम स्थळ अशी काव्यग्रंथ दिंडी, सकाळी 10 ते 12 महाकाव्य संमेलन उद्घाटन सोहळा, उद्घाटक प.पू. अण्णा राऊळ महाराज, कार्यक्रम आयोजक नक्षत्रांच देण काव्यमंचाचे संस्थापक राजेंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष नरेंद्रकुमार चव्हाण, पालकमंत्री दीपक केसरकर व पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची मनोगते, दु. 12 ते 12.30 वा. स्नेहभोजन, दु. 12.30 ते 1.30 वा. नक्षत्रबहार काव्य मैफल-1, दुपारी 1.30 ते 2.30 वा. स्मार्ट कवींची बोल्ड मैफल- 2, दु. 2.30 ते 3.30 वा. परिसंवाद विषय कोकणी, मालवणी, झाडी बोली, अहिराणी, योगदान यात प्रा. अरूण मर्गज कुडाळ, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोठेकर चंद्रपूर, कवि दिनेश चव्हाण जळगाव, प्रा. शिवाजी साळुंके वरोरा यांचा सहभाग असणार आहे.
दु. 3.30 ते 4.30 वा. नक्षत्रांची काव्यदौलत काव्यमैफल-3, सायं. 4.30 ते 5.30 वा. नक्षत्रांची काव्यतारांगण काव्यमैफल - 4, सायं. 5.30 ते 6.30 नक्षत्रांची काव्य उधळण काव्यमैफल- 5, सायं. 7 ते 8 वा. नक्षत्रांचे काव्यफुले काव्यमैफल-6, रात्री 8 ते 9 नक्षत्रांची काव्यबाग काव्यमैफल- 7, रा. 9 ते 10 नक्षत्रांची प्रेमकाव्य अलोरा काव्यमैफल - 8, रविवार दि. 13 मे रोजी काव्यचित्र लेखन स्पर्धा उपक्रम, स. 9 ते 10 वा. दुसर्या दिवसाच्या सत्राचे उद्घाटन खा. नारायण राणे यांच्या हस्ते, यावेळी 13 विभागातील काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण, स. 10 ते 11 नक्षत्रांची बहर फुलोरा काव्यमैफल- 9, स. 11 ते 12 नक्षत्रांची काव्य सफर काव्यमैफल- 10, दु. 1 ते 2 समीक्षकांची व प्रकाशकांची काव्यसंग्रहाबद्दलची काय भूमिका आहे यावर परिसंवाद, दु. 2 ते 3 नक्षत्रांची धारदार कवींची बहारदार काव्यमैफल- 11, दु. 3 ते 4 संमेलनाध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांची प्रकट मुलाखत, सायं. 4 ते 5 वा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते कार्यक्रम समारोप होणार आहे.
यावेळी मधू मंगेश कर्णिक यांचा सत्कार, पालकमंत्री दीपक केसरकर यांचे मनोगत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षीय भाषण, सायं. 5 ते 5.30 सहभागी कवी, कवयित्रींना स्मृतीचिनह व सन्मानपत्र वाटप, विश्वगीत व पसायदादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.