Tue, Nov 20, 2018 01:38



होमपेज › Konkan › राणेंचा मार्ग मोकळा

राणेंचा मार्ग मोकळा

Published On: Mar 15 2018 10:52PM | Last Updated: Mar 15 2018 9:22PM



अलिबाग : प्रतिनिधी

कोकणातील विद्वत्तापूर्ण मालिकेतील सुरेश प्रभू यांना भाजपने, तर हुसेन दलवाई यांना काँग्रेसने राज्यसभेत स्थान दिले असताना आता ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ पक्षाचे नारायण राणे यांचाही राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील 6 जागांची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे गुरुवारी (दि. 15) स्पष्ट झाले आहे. आता 23 मार्च रोजी याबाबतची अधिकृत घोषणा होईल.

राणे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर प्रवेश करीत आहेत. त्यामुळे कोकणातील राज्यसभेवर असणार्‍या खासदारांची संख्या आता 3 होणार आहे. तसेच राणेंचेही आता पुनर्वसन होणार आहे.
भाजपच्या विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. सहा जागांसाठी होणार्‍या राज्यसभा निवडणुकीत भाजपने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना ऐनवेळी सातवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, गुरुवारी (15 मार्च) रहाटकर यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत. सहा जागांसाठी 23 मार्च रोजी होणारी ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. भाजपकडून प्रकाश जावडेकर, व्ही. मुरलीधरन, नारायण राणे यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेकडून अनिल देसाई, तर काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व राष्ट्रवादीकडून वंदना देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.