Thu, Apr 25, 2019 04:03होमपेज › Konkan › एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jul 04 2018 4:38PM | Last Updated: Jul 04 2018 4:38PMअलिबाग : प्रतिनिधी 

अलिबाग तालुक्यातील आक्षी गावात एकाच कुटुंबातील 5 जणांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 2 महिला, 1 पुरुष तर 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. विष प्राशन केलेल्या 5 ही जणांना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर यातील दोन चिमुकल्यांना मुंबईत हलविण्यात आले असून, एका महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, रामचंद्र पाटील हे व्यवसायाने रिक्षा चालक आहेत. आज 4 जून रोजी त्यांनी त्याची पत्नी, सून व 2 नातवंडे यांनी शेतीला वापरण्यात येणारे  विषारी औषध शितपेयातून प्राशन केले. त्यानंतर स्वराज व स्वराली ही दोन चिमुकले जोरजोरात रडायला लागली. घरात माणसे असतानाही मुले का रडत आहेत हे पाहण्यासाठी शेजारच्या लोकांनी दरवाजा उघडला. त्यावेळी दोन चिमुकले रडत असून घरातील 3 जण बेशुध्द अवस्‍थ्‍ोत पडल्‍याचे दिसून आले. 

या घटनेचे गांभीर्य ओळखून  शेजारच्या लोकांनी आक्षीचे माजी सरपंच यांना बोलावून कुटुंबातील सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रामचंद्र पाटील आक्षी (वय 60), रंजना पाटील (50), कविता पाटील (25), स्वराली पाटील (दीड वर्ष ), स्वराज पाटील (दीड वर्ष) अशी विष प्राशन केलेल्यांची नावे आहेत. 

विष घेतल्‍याने पाचही नागरिकांची प्रकृती चिंताजनक झाल्‍याने पाचही जणांना जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील  रंजना व रामचंद्र यांची प्रकृती स्थिर असून सून कविता हिची तब्येत नाजूक असल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर स्वराज याच्या मेंदूपर्यत विषाचा प्रयोग झाला असल्याने त्याला मुंबई येथे हलविण्यात आले आहे. तर स्वराली हिची तब्येत ठीक असली तरी तिलाही मुंबईत हलवण्यात आले आहे.

सदरची घटना कळताच उपविभागीय अधिकारी डी. बी. निघोट व अलिबाग पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. मात्र ही विषबाधा पाटील कुटुबियांनी  विष हा घेतले याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही. एकाच कुटुंबातील 5 जणांनच्या विषबाधेमुळे आक्षी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.