Sat, Jun 06, 2020 09:32होमपेज › Konkan › आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी गोगटे-जोगळेकरच्या ऐश्‍वर्या सावंतची निवड

रत्नागिरीचं क्रीडा ‘ऐश्‍वर्य’ इंग्लंडच्या मैदानावर!

Published On: Aug 30 2018 1:19AM | Last Updated: Aug 29 2018 9:36PMरत्नागिरी : क्रीडा प्रतिनिधी

सप्टेंबरमध्ये इंग्लंड येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय महिला खो-खो स्पर्धेसाठी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू ऐश्‍वर्या सावंत हिची निवड झाली आहे. ऐश्‍वर्याने मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य महिला खो-खो संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचा मानाचा  ‘जानकी पुरस्कार’ आणि भारतातील खो-खो खेळासाठी महिला खेळाडूंना दिला जाणारा ‘राणी लक्ष्मी’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करून तिला सन्मानित करण्यात आले आहे. तिला शासनाची शिष्यवृत्तीही प्राप्त झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील व महाविद्यालयाची एक गुणी खेळाडू असलेल्या ऐश्‍वर्याची दि. 2 ते 4 सप्टेंबर 2018 रोजी इंग्लंड येथे होणार्‍या खो-खो खेळाच्या प्रसारासाठी व प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी खो-खो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे निवड झाली आहे.

ऐश्‍वर्याच्या निवडीबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर व सर्व पदाधिकारी, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे कार्यवाह संदीप तावडे आदींनी शुभेच्छा दिल्या.