Sat, Dec 14, 2019 01:59होमपेज › Konkan › कृषी, पर्यटन, रोजगारनिर्मितीवर भर 

कृषी, पर्यटन, रोजगारनिर्मितीवर भर 

Published On: Apr 19 2019 1:50AM | Last Updated: Apr 18 2019 9:31PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन, कृषी क्षेत्रास चालना, पर्यटन वाढीस उत्तेजना, बचतगट सक्षमीकरण, रोजगार निर्मिती, गडसंवर्धन यासह कोकणच्या जनतेच्या विकासासाठी आवश्यक असणार्‍या सर्व गोष्टी करण्याचे जाहीरनाम्यात आश्‍वासन दिले आहे.

रत्नागिरीतील रायगड निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत राणे यांनी जाहीरनामा पत्रकारांसमोर ठेवला. सिंधुदूर्गप्रमाणेच रत्नागिरीचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रुट प्रोसेसिंग इंडस्ट्री या भागात आणण्याला आपले प्राधान्य राहणार आहे. त्यामुळे येथील प्रक्रिया केलेली उत्पादने थेट जागतिक बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकतात. चिपळूण ते राजापूर दरम्यानच्या युवा वगासाठी स्कील डेव्हलपमेंट अ‍ॅकॅडमी उभारणार आहे. ही अ‍ॅकॅडमी आपण स्वखर्चातून उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी कॉलसेंटरद्वारे आरोग्याच्या सुविधा घरपोच करणे, स्व. शामराव पेजे महामंडळासाठी शंभर कोटी रुपये मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील इको सेन्सिटीव्ह झोन कायमस्वरुपी रद्द व्हावा यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण वेगाने व्हावे रत्नागिरीमध्ये इंटरनॅशनल दर्जाचे स्कूल , खेळाडूंसाठी स्पोर्टस फेडरेशन आदी  वर विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.