Tue, Apr 23, 2019 02:14होमपेज › Konkan › अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आज जैतापूर परिसरात दुचाकी रॅली

अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आज जैतापूर परिसरात दुचाकी रॅली

Published On: Jan 01 2018 1:59AM | Last Updated: Dec 31 2017 9:20PM

बुकमार्क करा
राजापूर :

राजापूर तालुक्यातील माडबन परिसरात होऊ घातलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात माडबन, जैतापूर, मिठगवाणे पंचक्रोशी संघर्ष समितीतर्फे नव्या वर्षाच्या प्रारंभी दि. 1 जानेवारी रोजी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली सकाळी 10 वा. नाटे येथील तबरेज सायेकर चौकापासून सागव्यापर्यंत आणि तेथून माडबन अशी काढण्यात येणार आहे. माडबन येथे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होऊ घातला आहे. सध्या याच तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला होत असलेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर जगातील सर्वात भयंकर आणि विध्वंसक प्रकल्पांपैकी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. अणुऊर्जा प्रकल्पामुळे एकूण 100 कि.मी.पेक्षा अधिक क्षेत्र बाधित होणार आहे. सध्या या प्रकल्पस्थळी संरक्षक भिंत आणि कार्यालय वगळता अन्य काहीही काम झालेले नाही. प्रकल्पाला हद्दपार  करण्यासाठी रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.