होमपेज › Konkan › युवा नेत्याने ‘सार्वजनिक बांधकाम’ला आणले जेरीस

युवा नेत्याने ‘सार्वजनिक बांधकाम’ला आणले जेरीस

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाच्या लेखा विभागात 31 मार्चच्या रात्री जोरदार खडाजंगी झाली. लांजातील छोट्या कामांची बिले आदा न केल्याने राष्ट्रवादीत असलेल्या युवा नेत्याने रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील उत्तर विभागाच्या कार्यालयात येऊन अधिकारी वर्गाला दमात घेतले. पुढील 15 दिवसांत छोट्या कामांची बिले निघतील, असे अधिकार्‍यांनी आश्‍वासन दिल्यानंतर युवा नेते व त्यांचे सहकारी शांत झाले. तोपर्यंत मात्र अधिकारी वर्ग जेरीस आला होता.

मार्च एंडिंगमुळे विविध प्रक्रिया पूर्ण करण्याची सा.बां.विभागांमध्ये धावपळ सुरू असते. आपली बिले मिळावीत यासाठी ठेकेदार मंडळींचीही रात्री उशिरापर्यंत कार्यालयात वर्दळ सुरू असते. यावर्षी मात्र वातावरण पूर्ण उलट होते. गेल्यावर्षीपर्यंत  ठेकेदारांचीही वर्दळ तुलनेने फारच कमी होती. 31 मार्चचे काम पूर्ण व्हावे, यासाठी गेल्या गुरुवारी, शुक्रवारी सुट्टी असतानाही सा.बां.चे काम शांततेत सुरू होते. मात्र, या शांततेला 31 मार्चच्या रात्री गालबोट लागले.

Tags : Konkan, Konkan News,  assurance, officials, young leader, associates,  calm.


  •