पाणी योजनेत दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई?

| पुढारी"> होमपेज › Konkan ›

पाणी योजनेत दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई?

पाणी योजनेत दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई?

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 12:25AMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील नळ पाणी योजनांच्या प्रस्तावित कामात  दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांसह ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेला केल्या आहेत. आगामी उन्हाळ्यात भेडसावणार्‍या पाणीटंचाईसाठी साडेपाच कोटींचा आराखडा तयार करून त्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी दीड कोटीचा निधी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.

अलीकडेच झालेल्या लोकशाही दिनात अनेक गावांत नळपाणी योजना निकृष्ट आणि नादुरुस्त असल्याने उन्हाळ्यात या गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावणार असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची दखल घेताना जिल्ह्यातील अशा योजनांची यादी जिल्हा परिषदेला देण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. त्यानुसार बुधवारी या योजनांचा आढावा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. या योजनांमुळे सुमारे 100 गावे टंचाईग्रस्त राहणार असून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने अनेक योजना बंद स्थितीत असल्याचे पुढे आले आहे. तसेच योजना नादुरुस्त असल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी आता वाढीव दराने दुरुस्तीचा निधी आवश्यक आहे. अशा अपूर्ण योजनांचा आढावा बुधवारी घेण्यात आला. ज्या योजना नादुरुस्त आहेत, अशा योजनांना जबाबदार असणार्‍या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिले.