Thu, Jun 20, 2019 02:04होमपेज › Konkan › राष्ट्रीय सुरक्षा आदेश भंगप्रकरणी २०४ जणांवर कारवाई

राष्ट्रीय सुरक्षा आदेश भंगप्रकरणी २०४ जणांवर कारवाई

Published On: Jan 01 2018 1:59AM | Last Updated: Dec 31 2017 9:06PM

बुकमार्क करा
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

देशात विविध ठिकाणी झालेले दहशतवादी हल्ले व दहशतवादी  कृत्यांना प्रतिबंध  घालण्याच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिस दलाकडून विविध उपाययोजना  करण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने जारी केलेल्या आदेशाचे  भंग करणार्‍या  जिल्ह्यातील 204 जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.  राष्ट्रहीताच्या दृष्टीने जे कोणी  लेखी नोटीस प्राप्त झाल्याच्या  दिनांकापासून सात दिवसांत आपली माहिती पोलिसांना  सादर करणार नाहीत. त्याच्या  विरूध्द कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र  करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिली. 

देशात विविध ठिकाणी  झालेले दहशतवादी हल्ले व कृत्ये यांना प्रतिबंध करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस दलाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर  जिल्ह्यामध्ये  असलेल्या समाज विघातक प्रवृत्ती याचा शोध घेण्यासाठी तसेच यापूर्वी घडलेले मालमत्ता  विषयक गुन्हे व इतर सर्व प्रकारच्या गुन्ह्यास व अवैध कारवाईस आळा घालण्यासाठी आणि राष्ट्रीय  सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी,सिंधुदुर्ग यांनी संपूर्ण जिल्ह्यासाठी  प्रतिबंधात्मक आदेश जारी करून कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत घरमालकांनी आपल्याकडे ठेवलेल्या भाडेकरूंची माहिती मुदतीत पोलिसांना न दिल्याने 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना न्यायालयामध्ये दंडात्मक शिक्षा झाली आहे.  तसेच हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, न्याहरी  निवास योजना चालक -मालकांनी  त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांची  माहिती न दिल्याने  7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सर्वात महत्त्वाचे  म्हणजे  जे बागायतदार, व्यावसायिक, ठेकेदार, व्यापारी यांनी त्यांच्याकडे कामासाठी ठेवलेल्या परप्रांतीय, अपरिचीत कामगारांची माहिती न दिल्याने आतापर्यंत  88 व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधितांना न्यायालयामध्ये दंडात्मक शिक्षा  झालेल्या