Mon, Nov 19, 2018 04:57होमपेज › Konkan › आंबा संरक्षणासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

आंबा संरक्षणासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 10:23PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

डिसेंबरमध्ये झालेले ओखी वादळ आणि बदलत्या वातावरणाचा फटका आंबा मोहोराला बसू नये, यासाठी जिल्ह्यात कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आंबा पिकाच्या संरक्षणासाठी कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी दिली. बदलत्या वातावरणानुसार आंबा मोहर संरक्षणासाठी कृषी विभागाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. कृषी उपविभागीय अधिकार्‍यांच्या मार्गदशर्र्नाखाली तातडीच्या उपाययोजना अमलात आणण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक गावात दोन ‘कृषिमित्र’ नेमण्यात आले आहेत. 

डिसेंबरच्या अखेरीस जिल्ह्यातील वातावरणात गारवा होता. त्याआधी झालेल्या ओखी वादळाने अनेक भागात आलेला मोहर गळून गेला. त्यामुळे  यंदाच्या हंगाम उशिरा सुरू होणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. डिसेंबर अखेरीस जिल्ह्यातील तापमान 11 ते 15 अंश सेल्सिअसने खाली उतरले होते. मात्र, या आठवड्यात पुन्हा तापमान वाढले असून ते 18 ते 22 अंश सेल्सिअसकडे सरकले आहे. वातावरणात कमालीचा गारवा असला तरी उन्हाचा मागमूस नसल्याने आंब्यावर तुडतडा, फूलकीड आणि बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे.