Sun, Feb 24, 2019 09:02होमपेज › Konkan › मराठा आंदोलनाला हिंसक वळण देणार्‍यांवर कारवाई : दीपक केसरकर 

मराठा आंदोलनाला हिंसक वळण देणार्‍यांवर कारवाई : दीपक केसरकर 

Published On: Jul 28 2018 1:34AM | Last Updated: Jul 27 2018 11:19PMसावंतवाडी : प्रतिनिधी

राज्यात झालेल्या सकल मराठा समाजाच्या मोर्चा आंदोलनामध्ये ज्या समाजकंटकांनी घुसून आंदोलनाला हिंसक वळण दिले त्याची नोंद घेतली जाईल. याबाबतचे फुटेजही तपासले जाईल व त्यांच्यावर कारवाईही केली जाईल असे, संकेत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.  

ते सावंतवाडी येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सिंधुदुर्गातील आंदोलन शांततेत पार पाडल्याबद्दल जनतेचे आभार मानले. सकल मराठा समाजाचे मोर्चा आंदोलन शांततेत पार पडले असून आतापर्यंत शांततेत झालेल्या क्रांती मोर्चामुळे मराठा समाजाचे नाव जगभर झाले आहे.शासनाने जाहीर केलेल्या सवलती मराठा समाजापर्यंत पोहोचविल्या जातील.  जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाला सर्वांनीच पाठिंबा दिला असून काही तुरळक घटना वगळता सिंधुदुर्गात शांततेत आंदोलने झाली त्याबद्दल सकल मराठा समाजाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आभार व्यक्‍त केले. 

पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळली. बळाचा वापर केला. संयमाची भूमिका घेऊन कायदा -सुव्यवस्था राखली. यात पोलिसही जखमी झाले. त्यांची योग्य ती काळजी घेतली जाईल. हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना तसेच या आंदोलनात मरण पावलेल्या मयतांच्या कुटुंबियांनाही मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वी आंदोलक मयताच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली असल्याचे ते म्हणाले.