Tue, Mar 19, 2019 11:22होमपेज › Konkan › महामार्गावर अपघात; दोन ठार; १४ जखमी

महामार्गावर अपघात; दोन ठार; १४ जखमी

Published On: Mar 26 2018 1:30AM | Last Updated: Mar 25 2018 10:57PMसावर्डे : वार्ताहर / खेड : प्रतिनिधी 

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील आगवे येथे आराम बस उलटून झालेल्या अपघातात 13  प्रवाशांसह चालक जखमी झाला. तर महामार्गावर खेड तालुक्यातील उधळे येथे भरधाव कारने धडक दिल्याने दोन पादचारी जागीच ठार झाले. आगवे येथील अपघात रविवारी पहाटे, तर उधळे येथे शनिवारी मध्यरात्री अपघात झाला.

उधळे येथील अपघातात विश्राम विठ्ठल होडबे (वय 60) व रमेश गणपत सकपाळ (44, दोघे रा. तोंडली, मंडणगड) जागीच ठार झाले आहेत. सावर्डे - आगवे येथील धोकादायक वळणावर रविवारी रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटून खापरेश्‍वर ट्रॅव्हल कंपनीची मालवण आराम बस (एमएच 07 - एजे 9063) ही रस्त्याच्या डाव्या बाजूच्या झाडावर आदळून उलटली. यात 13  प्रवाशांसह चालक जखमी झाला.

कल्पना केळुस्कर (68), सागर रमेश परब (25), ज्ञानेश पाटील (4), प्रेरणा केळुस्कर (40), रसिका पराडकर (60), विद्याधर तांडेल (45 रा. सर्व मालवण),  सतीश कंडाळकर (42), केदार भासणे (35), सुरुची कंडाळकर (36), हेमंत आमरे (30 सर्व रा. मुंबई), राजीअल हुसेन (38, रा. बेनई), अनघा गांगण (63), अनंत गांगण (66, सर्व रा. राजापूर), लियाकत अली (33, कोलकाता), जयंद्र जाकमदे (42, कणकवली) हे अपघातात जखमी झाले असून डेरवण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चालक विद्याधर तांडेल व एक महिला यांना गंभीर दुखापत झाली असून अन्य जखमींची प्रकृती सुधारत आहे.

महामार्गावर शनिवारी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने वेगाने जाणार्‍या कारने दोघा पादचार्‍यांना धडक दिली.

Tags : Highway, Accident, Two killed, 14 injured, Ratnagiri news,