Mon, May 20, 2019 18:17होमपेज › Konkan › नगरसेवक अविनाश केळसकर यांच्या गाडीला अपघात

नगरसेवक अविनाश केळसकर यांच्या गाडीला अपघात

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 03 2018 9:10PMचिपळूण : खास प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे चालकाला डुलकी आल्याने अचानक गाडीला ब्रेक लागले व गाडी नाल्यात उलटली. या अपघातात चिपळुणातील नगरसेवकासह चौघेजण जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. नगरसेवक राजेश केळसकर हे पनवेल येथील गांधी रुग्णालयात दाखल असून त्यांना किरकोळ इजा झाली आहे.

येथील अपक्ष नगरसेवक राजेश केळसकर, बांधकाम व्यावसायिक संतोष तडसरे, न.प.चे कर्मचारी मंगेश पेढांबकर, प्रकाश देसाई हे महिंद्रा एक्सयूव्ही गाडीने मुंबईकडे जात होते. पहाटेच्या सुमारास ते चिपळुणातून मार्गस्थ झाले. गाडी माणगाव येथे आली असता चालकाला डुलकी आली. त्यात अचानक ब्रेक लागून गाडी थेट रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. यावेळी केळसकर यांच्या पोटात नाल्यातील पाणी गेले व ते बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ माणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटातील पाणी काढल्यानंतर पनवेल येथील गांधी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. अपघाताची माहिती मिळताच माजी नगरसेवक बरकत वांगडे, प्रकाश देसाई आदीस रुग्णालयात पोहोचले.