Tue, Feb 19, 2019 14:34होमपेज › Konkan › कशेडी घाटात कारला अपघात, सुदैवाने जीवित हानी टळली

कशेडी घाटात कारला अपघात, सुदैवाने जीवित हानी टळली

Published On: Jan 30 2018 5:20PM | Last Updated: Jan 30 2018 5:20PMरायगड: पोलादपूर प्रतिनिधी
 मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारला कशेडी घाटात अपघात झाला. आज दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी नाही.


चिपळूण मार्गावरून मुंबई दिशेने जाणारी कार कशेडी घाटातील भोगाव गावच्या हद्दीत घाट उतरत असताना एका अवघड वळणावर अचानक कारचा पुढचा टायर फुटल्याने कार महामार्गालगत साईड पट्टीवर घसरून गटारात दगडावर पलटी झाली. कारमधून चालकासह दोन महिला आणि एक पुरूष असे  चौघे जण प्रवास करत होते.