Thu, Sep 20, 2018 11:22होमपेज › Konkan › वेरळ घाटात अपघात; पाच गंभीर

वेरळ घाटात अपघात; पाच गंभीर

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 10:59PM

बुकमार्क करा

लांजा : प्रतिनिधी 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर  लांजानजीक वेरळ घाटात इनोव्हा आणि कंटेनरची सामोरासमोर टक्‍कर  होऊन झालेल्या भीषण अपघातात इनोव्हा कारमधील 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या  अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

लांजापासून 5 कि. मी. अंतरावर असलेल्या वेरळ घाटात ही घटना घडली असून, मुबईहून गोव्याकडे जाणारा कंटेनर आणि मुंबईच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार ही दोन वाहने एकमेकांसमोर जोरदार आदळल्याने हा अपघात झाला. यामध्ये इनोव्हामधील  5 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. 

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातातील सर्व गंभीर मुंबई येथील असल्याचे सांगण्यात आले. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे नेल्याने त्यांची नावे समजली नाहीत. या अपघाताची नोंद केली आहे.