Thu, Apr 25, 2019 04:13होमपेज › Konkan › कोकीसरे येथे अपघात; सात जखमी

कोकीसरे येथे अपघात; सात जखमी

Published On: Jun 16 2018 10:46PM | Last Updated: Jun 16 2018 10:36PMवैभववाडी : प्रतिनिधी

विजयदुर्ग-कोल्हापूर मार्गावर कोकिसरे-घंगाळवाडीनजीक इनोव्हा कार व खासगी आराम बस यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात इनोव्हा चालकासह सातजण जखमी झाले आहेत. यापैकी तीनजण गंभीर जखमी आहेत. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी तिघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लाईफटाईम हॉस्पिटल पडवे येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात इनोव्हा गाडीचा चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले आहे. तर आराम बसचेही नुकसान झाले आहे. हा अपघात   शनिवारी सकाळी 6 वा.सुमारास घडला. विजयदुर्ग-कोल्हापूर मार्गावरून  मुंबईवरून गोव्याकडे जाणारी व्हीआरएल कंपनीची खासगी आरामबस चालक भीमराव पुंडलिक सुटकर (रा. बेळगाव) हा मुंबईवरून पुणे-कोल्हापूर-वैभववाडी मार्गे गोव्याकडे जात आसताना गाडी  कोकिसरे-घंगाळेवाडी येथे आली असता, तळेरेहून वैभववाडीच्या दिशेने येणारी इनोव्हा कार यांच्यात समोरासमोर धडक झाली.  या अपघातात कार चालक रोशन सुरेश धुरे (रा.कासार्डे), पूजा प्रकाश तळेकर (23) व सुचिता उदय सुर्वे हे तीघे गंभीर जखमी झाले आहेत.  तर शुभम सुनिल तळेकर (23), मिनाली गोपाळ बांदीवडेकर (24), मिनाक्षी गणेश पवार, रुचिरा रमाकांत सावंत (सर्व रा.तळेरे कासार्डे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात  कारचा चक्काचूर झाला आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालया कणकवली दाखल करण्यात आले आहे.अपघात झाल्यानंतर खासगी आराम बसचालकाने घटनास्थळावरुन घाबरुन पळाला होता.  पण काही तासात तो पोलिस स्थानकात हजर झाला. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस उपनिरीक्षक जयश्री भोमकर, पद्मिनी मयेकर, सुनील पडेलकर, श्री.पुरळकर, अनमोल रावराणे, चालक कदम  यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी धाव घेत जखमींना ग्रामस्थ व प्रवाशांच्या मदतीने बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

 रुग्णवाहिकेसाठी कोकिसरे फाटक उघडून रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातून रुग्णवाहिका नेत असताना, कोकिसरे रेल्वे फाटक पडले.  मात्र, रुग्णांची गंभीर अवस्था लक्षात घेऊन रेल्वे कर्मचार्‍यांनी फाटक उघडून रुग्णवाहिका सोडली. अन्यथा अपघातातील रुग्णांना काही वेळ तडफडत राहावे लागले असते. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सौ. भोमकर करत आहेत.