होमपेज › Konkan › कोकणात येऊ घातलेल्या प्रकल्पांचे स्वागत करा : ना.रवींद्र चव्हाण

कोकणात येऊ घातलेल्या प्रकल्पांचे स्वागत करा : ना.रवींद्र चव्हाण

Published On: Feb 12 2018 1:58AM | Last Updated: Feb 11 2018 9:28PMबांदा : वार्ताहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवभारतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. देशात प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत.देश आज प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहेत. मात्र बेरोजगारीची मोठी समस्या आहे. ती दूर होण्यासाठी नवनवीन प्रकल्प कार्यान्वित होणे आवश्यक आहे. कोकणातही काही नवीन प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे येथील बेरोजगारांना रोजगार मिळणार असून कोकणचा कायापालट होणार आहे, म्हणूनच कोकणात होऊ घातलेल्या प्रकल्पांचे खुल्या मनाने स्वागत करा, असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

बांदा भाजप आयोजित बांदा लोकोत्सव 2018 च्या समारोप सोहळ्यात ना. चव्हाण बोलत होते.भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, भाजपा तालुकाध्यक्ष महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, प्रदेश मंत्री शरद चव्हाण, जि. प. सदस्या सौ.श्‍वेता कोरगावकर, राजेंद्र म्हापसेकर, सावंतवाडी उपनगराध्यक्षा सौ.अन्‍नपूर्णा कोरगावकर,  पं. स. सदस्य शीतल राऊळ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शामकांत काणेकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, अतुल रावराणे,भाजप प्रवक्‍ते काका कुडाळकर,लोकोत्सव संयोजक अतुल काळसेकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, उपसरपंच अक्रम खान आदी उपस्थित होते. ना.चव्हाण यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

ना.रवींद्र चव्हाण म्हणाले, बांदा लोकोत्सव हा येथील सांस्कृतिक महोत्सव बनला आहे. आपल्या कुटुंबातील सण असल्याप्रमाणे सर्वजण यात सहभागी होतात हे कौतुकास्पद आहे. माजी शिक्षण आरोग्य सभापती प्रमोद कामत म्हणाले, ना.चव्हाण यांनी माकडताप साथीवेळी दिलेले तातडीचे सहकार्य न विसरण्यासारखे आहे.  यापुढेही त्यांनी असेच सहकार्य करावे.राजन तेली यांनी अप्रत्यक्षपणे पालकमंत्री दीपक केसरकर यांना टोला लगावताना आम्ही तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री बदलावेत अशी मागणी केली होती अशी टिप्पणी केली. सतीश सावंत म्हणाले, आम्ही फक्‍त चांदा ते बांदा हे ऐकत आणि वाचत आलो आहोत. जिल्ह्यासाठी या योजनेतून अमुक कोटींचा निधी आला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले जाते. मात्र कोणासाठी किती निधी आला हे मात्र अद्याप समजू शकले नाही, असा टोला ना. केसरकरांचे नाव न घेता लगावला.

सरपंच मंदार कल्याणकर, संयोजक अतुल काळसेकर यांनीही मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविक अतुल काळसेकर यांनी  तर सूत्रसंचालन अक्षय वाटवे व राकेश केसरकर यांनी केले.आभार सरपंच मंदार कल्याणकर यांनी मानले.