Wed, Jan 22, 2020 13:23होमपेज › Konkan › देवरूखचे उपनगराध्यक्ष शेट्येंचा काँग्रेसला रामराम

देवरूखचे उपनगराध्यक्ष शेट्येंचा काँग्रेसला रामराम

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 01 2017 11:34PM

बुकमार्क करा

देवरूख : वार्ताहर

देवरूखमधील काँगे्रसचे विद्यमान उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये काँगे्रसला रामराम ठोकून शनिवारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. याप्रसंगी भाजपच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

अभिजीत शेट्ये भाजपची ध्येय-धोरणे आवडल्याने आपल्या समर्थकांसह प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे माजी उपसरपंच यशवंत गोपाळ व माजी ग्रा. पं. सदस्य उमेश शिवगण हेही यावेळी भाजप प्रवेश करणार आहेत. हा कार्यक्रम शहरातील चिंतामणी मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी 6 वा. होणार असल्याचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

शेट्ये हे काँगे्रसचे न.पं.मधील एकमेव नगरसेवक असताना दोन वर्षांनी झालेल्या न.पं.च्या नगराध्यक्ष बदलाप्रसंगी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी एकत्र येत न. पं. वर सत्ता स्थापन केली. यात शेट्ये यांच्यावर उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. अभिजीत शेट्ये व नगराध्यक्ष नीलेश भुरवणे यांनी देवरूखच्या विकासासाठी काम करत असताना सहकारी नगरसेवकांच्या सहकार्याने तब्बल 12 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्‍त करून देवरूख शहराचा विकास साधला.

संगमेश्‍वर तालुक्यात काँगे्रसमध्ये काम करताना नैराश्य आल्यामुळे शेट्ये यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. या कार्यक्रमापूर्वी भाजपच्या तालुका व देवरूख शहर संपर्क कार्यालयांचे  उद्घाटन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाळ माने व कोकण संघटक सतीश धोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.  या निमित्ताने भाजपचा कार्यकर्ता मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शेट्ये यांच्यासोबत संगमेश्‍वर तालुक्यातील इच्छुक कार्यकर्तेही पक्षात प्रवेश करणार आहेत.