Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › निराधार कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा करुन ठेवला आदर्श!

निराधार कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा करुन ठेवला आदर्श!

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 04 2017 11:05PM

बुकमार्क करा

दोडामार्ग :राजाराम गवस 

आजची नवी पिढी  ही नवीन चालीरिती,संस्कार  घेऊन समाजात वावरत असताना दिसते.स्वतःचा वाढदिवसही आपल्या मित्रासोबत एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये मोठा खर्च करून साजरे करताना दिसतात.यामुळे आजची पिढी संस्कार विसरत चालली आहे असे अनेकांकडून बोलले जाते.परंतु याला छेद देत दोडामार्ग येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या नवीता बोडेकर या विद्यार्थीनीने आपला वाढदिवस आपल्या मित्रासोबत उघड्यावर राहणार्‍या ओडिसा येथील  कुटुंबासमवेत साजरा केला.यावेळी तिने आईसोबत राहणार्‍या ‘त्या’ दोन मुलांना जीवनावश्यक वस्तूंची भेट देत युवा पिढी समोर एक नवा आदर्श निर्माण केला.

यावेळी  नविता बोडेकर,मोनिका गवस, लीला गवस,रोहन खडपकर, शुभम धुरी, श्रद्धा साटम, संदेश गवस,राजाराम गवस, प्रियांका कुबल, तृप्ती नाईक   तसेच पत्रकार रत्नदीप गवस, भाकर धुरी, संदेश देसाई, तेजस देसाई, लखू खरवत  उपस्थित होते . 

नवीता बोडेकर ही विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.दोडामार्ग धाटवाडी येथे ती राहते.सोमवारी तिचा वाढदिवस होता.तत्पूर्वी ओडीसा येथील दोन लहान मुले आपल्या आईसोबत उघड्यावर वास्तव्य करत असल्याचे हृदयपिळवटणारे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल नवीता हिने घेत स्वतःचा वाढदिवस एखाद्या हॉटेल किंवा कॅफेमध्ये केक कापून साजरा न करता  त्या पैशातून दोडामार्ग मध्ये उघड्यावर राहणार्‍या ‘त्या’कुटुंबाला आवश्यक वस्तू व खाऊ देऊन वाढदिवसाची एक अनोखी भेट दिली. नवीताने  हे सामाजिक कार्य करुन युवा पिढी समोर एका नवा आदर्श  ठेवला आहे.