Wed, Jan 16, 2019 09:15होमपेज › Konkan › सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचा शानदार शुभारंभ

सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचा शानदार शुभारंभ

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 10:26PM

बुकमार्क करा
सावंतवाडी : प्रतिनिधी 

पर्यटन महोत्सव 2017 चा शानदार शुभारंभ बुधवारी सायंकाळी हवेत फुगे सोडून झाला. त्यानंतर फूड फेस्टिव्हलचे फीत कापून उद्घाटन  झाले. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खा.विनायक राऊत, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, माजी आ. राजन तेली, सभापती बाबू कुडतरकर, आनारोजीन लोबो, माधुरी वाडकर, भारती मोरे, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, गटनेते राजू बेग, अ‍ॅड परिमल नाईक, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, समृद्धी विर्नोडकर, दीपाली भालेकर, दीपाली सावंत तसेच तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, शहरप्रमुख शब्बीर मणियार, प्रकाश परब, राघोजी सावंत, बबन राणे, विक्रांत सावंत, सागर नाणोस्कर, नागेंद्र परब, रश्मी माळवदे आदी उपस्थित होते

सुरुवातीला मोतीतलावाच्या काठावरुन भव्य  चित्ररथांसह चलत  शोभायात्रेने शुभारंभ झाला. तेजोमय सांस्कृतिक कला पथकाचे ढोलपथक संचलन करण्यात आले.  त्यानंतर  खाद्यजत्रा व विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन झाले.विविध सांस्कृतिक कार्यक्रम व ओडिसी नृत्य  आंतरराष्ट्रीय किर्तीची नृत्यांगना स्मृतिरेखा दास  यांचा कार्यक्रम झाला. ‘खेळ पैठणीचा’ शुभारंभ टि.व्ही.अँकर तुषार सावंत  यांनी केले.नाद सुरमयी -भावगीत भक्‍तिगीत, लावणी गोंधळ जुनी नवी मराठी चित्रपट गीतांनी सजलेला कार्यक्रम झाला.

गुरुवार28 रोजी सायं. 6.30 वा. स्थानिक विजेत्यांचे कार्यक्रम होणार आहेत. 7.30 वा. ओडिसी नृत्य, 8 वा. साक्षात्कार प्रॉडक्शन प्रस्तुत मालवणी सुरांच्या गजाली, 8.30 वा. ऋतिक फाऊंडेशन प्रस्तुत संगीत रजनी  पंडित जयतीर्थ मेहुडी यांचा शास्त्रीय उपशास्त्रीय नाट्यसंगीत गायन वादनाचा कार्यक्रम होणार आहे.