Sun, Mar 24, 2019 13:06होमपेज › Konkan › श्री विठ्ठल दर्शनासाठी १६५ किलोमीटरची सायकल सवारी

श्री विठ्ठल दर्शनासाठी १६५ किलोमीटरची सायकल सवारी

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:05AMटोप : वार्ताहर 

वैद्यकीय व्यावसायिक व इतर हौशी तरुणांचा समावेश असलेल्या पेठवडगावच्या ट्रेल हंटर्स गुपच्या पाच सदस्यांनी आषाढी एकादशीनिमित्त सायकल प्रवास करत पेठवडगाव ते पंढरपूर हे 165 किलोमीटरचे अंतर सहा तासात पूर्ण करत विठ्ठल दर्शन घेतले. 

या ग्रुपमध्ये टोप, पेठवडगाव, किणी येथील वैद्यकीय व्यावसायिक आहेत. यावर्षी ग्रुपचे सदस्य पं.स. सदस्य डॉ.प्रदीप पाटील, डॉ.शशिकांत कुंभार, पवन जंगम, प्रा.राहुल नेजकर, ओमकार पाटोळे यांनी सायकलवरुन पंढरीची वारी उपक्रमात सहभागी घेतला होता. पेठवडगाव ते आष्टा, तासगाव, आटपाडी, महूद ते पंढरपूर हा 165 किलोमीटरचा प्रवास करुन फिटनेसचा  संदेश दिला.