Tue, Jul 16, 2019 22:41होमपेज › Konkan › ऑलिव्ह रिडलेच्या 97 पिल्‍लांचे समुद्रार्पण 

ऑलिव्ह रिडलेच्या 97 पिल्‍लांचे समुद्रार्पण 

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 8:23PMवेंगुर्ले : प्रतिनिधी 

वेंगुर्ले - मोचेमाड समुद्र किनारी संरक्षित केलेल्या दुर्मीळ प्रजातीच्या ऑलिव्ह रिडले कासवाची 97 पिल्ले बुधवार सकाळी वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी,वनविभाग व स्थानिकांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली.

मोचेमाड समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले कासवाची 118 अंडी येथील कासवमित्र आत्माराम तांडेल यांनी वनरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जाळ्याचे कुंपन करून अंडी संरक्षित केली होती. पैकी बुधवारी 97 पिल्ले सकाळच्या सुमारास अंडयातून बाहेर आली. यासंबंधी वनविभागाला माहिती देताच मठ वनपाल रामचंद्र मडवळ, तुळस वनरक्षक एस एस कांबळे ,वनरक्षक प्रियंका पाटील,जयश्री शेलार यांनी   मोचेमाड समुद्र किनारी दाखल होत पाहणी व पंचनामा करून वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी तसेच येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पिल्लांना मोचेमाड समुद्रात नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. स्थानिक नाथा होडावडेकर, राजाराम तांडेल, श्रीधर कोचरेकर, रमाकांत कोचरेकर आदी उपस्थित होते. 

मोचेमाड समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लाना समुद्रात सोडण्याची गेल्या दोन महिन्यात ही पाचवी वेळ असून आतापर्यत 26 मार्चला 61पिल्ले, 8 एप्रिलला 75 व 57 पिल्ले ,11 एप्रिलला 52 पिल्ले तर 12 एप्रिलला 97 पिल्ले मिळून 342 पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. अजुनही ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडयाची सहा घरटी या किनारी संरक्षित असून एप्रिल व मे महिन्यात या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

Tags : Konkan, 97, Puppies, Olive, Ridley, sea