Sat, Jul 20, 2019 10:44होमपेज › Konkan › गणपतीपुळेच्या विकासासाठी ८० कोटी

गणपतीपुळेच्या विकासासाठी ८० कोटी

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 10:29PMरत्नागिरी : शहर वार्ताहर 

गेल्या अनेक वर्षांपासूनच्या रखडलेल्या गणपतीपुळ्याच्या विकास आराखड्याची जबाबदारी अखेर वित्त व नियोजन विभागाने स्वीकारली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी गणपतीपुळ्याच्या विकास आराखड्याचा मुद्दा गुरूवारी वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत पुन्हा उपस्थित केल्यानंतर विभागाने रूपये 80 कोटींच्या विकास आराखड्याची जबाबदारी स्वीकारली. एवढेच नव्हे तर मार्लेश्‍वर येथील नयनरम्य अशा धबधब्याच्या परिसराच्या विकासासाठीही निधी देण्याचे त्यांनी मान्य केले. 

जिल्ह्यासाठीच्या जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात पार पडली. या बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी, सदानंद चव्हाण, उदय सामंत, संजय कदम, जिल्हाधिकारी पी. प्रदीप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मिश्रा तसेच विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

या बैठकीत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा रुपये 670 कोटींचा पर्यटन विकास यापूर्वीच सादर करण्यात आला होता. यात गणपतीपुळे विकास आराखड्याचाही समावेश होता. मात्र, जिल्ह्याच्या पर्यटनासाठी आवश्यक निधीच न मिळाल्याने जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास करणे शक्य झाले नाही, असे स्पष्ट मत मांडले. त्यामुळे विभागाकडे सादर करण्यात आलेल्या रुपये 80 कोटींच्या पर्यटन विकास आराखड्याचे जिल्हाधिकारी  सादरीकरण केले. गणपतीपुळ्याच्या पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण केल्यानंतर यासाठी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करण्यात यावा, असे मत वायकर यांनी यावेळी मांडले. त्यानुसार वित्त व नियोजनमंत्री मुनगंटीवार यांनी तात्काळ विशेष बाब म्हणून वित्त व नियोजन विभागाकडून विशेष बाब म्हणून हा प्रस्ताव हाती घेण्याच्या 
निर्देश अधिकार्‍यांना दिले. 

या आराखड्यात रस्ते विषयक सेवा, वाहनतळ, सांडपाणी प्रक्रीया व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, सुशोभिकरण व इतर आवश्यक सुविधा तसेच रस्ते विषयक सेवा यांचा समावेश आहे.  एवढेच नव्हे मार्लेश्‍वर तीर्थक्षेत्र येथेही नैसर्गिक असा धबधबा असून तेथील पर्यटन विकास आराखड्यासाठी निधी देण्यात यावा, अशी विनंती वायकर यांनी मुनगंटीवार यांना केली. पर्यटन विभागाकडून या मार्लेश्‍वर तीर्थक्षेत्र विकासासाठी रुपये 2 कोटी देण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच शाळा दुरुस्तीसाठी अतिरिक्‍त निधी देण्याची ग्वाही मुनगंटीवार यांनी रत्नागिरी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांना दिली.