Wed, Jul 24, 2019 12:08होमपेज › Konkan › ‘नियोजन’चा 75 टक्के निधी अखर्चितच

‘नियोजन’चा 75 टक्के निधी अखर्चितच

Published On: Feb 01 2018 11:22PM | Last Updated: Feb 01 2018 10:45PM रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा नियोजनात मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांवर चालू आर्थिक वर्षात 25 टक्के निधी खर्ची पडला आहे. मार्च अखेरपर्यंत 75 टक्के निधी खर्ची पडणे आवश्यक आहे. आतापर्यंत नियोजनचा 75 टक्के निधी अखर्चित राहिला आहे. मात्र, नियोजन मंडळाचे सदस्य केवळ निधी कमी मिळत असल्याची टीका करत आहेत. हा निधी खर्ची पडला नाही तर तो परत जाण्याची शक्यता आहे.

गतवर्षी जिल्हा नियोजन मंडळाने चालू आर्थिक वर्षातील विविध विकासकामांसाठी 170 कोटींच्या आराखड्याला मान्यता दिली होती. त्यांपैकी 31 कोटींचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधी केंद्रीय योजनांकडे वर्ग करण्यात आला. मात्र, त्यांपैकी केवळ 25 टक्के निधी खर्ची पडला असून अद्यापही 8 कोटींचा निधी नियोजनकडे असून चालू आर्थिक वर्षात तो खर्ची पडणे आवश्यक आहे. 

मंगळवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत निधी तूटपुंजा असल्याची टीका करण्यात आली. पालकमंत्र्यांनीही या निधीला कात्री लावल्याने विकासकामे करताना अडचणी येत असल्याची कैफीयत मांडली गेली. चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजनचा 25.40 टक्के निधी खर्ची पडला असून अद्यापही उर्वरित निधी प्रस्तावित आहे. आगामी काळात शिल्लक निधी वेळेत खर्ची पडणार का? याकडे लक्ष लागले आहे.