Fri, Apr 19, 2019 08:14होमपेज › Konkan › खा. शरद पवार यांच्या फंडातून चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघासाठी ७५ लाखांचा निधी

खा. शरद पवार यांच्या फंडातून चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघासाठी ७५ लाखांचा निधी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सावर्डे : वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या खासदार फंडातून चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघातील गावामध्ये रस्ते, साकव पूल, पाखाड्या आदी विकासकामांसाठी 75 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

या विकासकामांसाठी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी विशेष प्रयत्न केले. असून खा. शरद पवार यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. शुक्रवारी चिपळूण तालुक्यातील कादवड येथील बलदेवाडी ते गुरववाडी या 4 लाख रुपये रस्ता डांबरीकरण, मजबुतीकरण कामाचा प्रारंभ जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयेंद्रथ खताते, बळीराम शिंदे, पं. स. सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, सरपंच सोनाली जाधव, उपसरपंच शिवाजी शिंदे, विष्णुपंत सावर्डेकर, जयंत शिंदे, जयराम शिंदे, संतोष शिंदे, अनंत शिंदे, दिनेश शिंदे, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे, दीपिका संकपाळ, अब्दुल रेहमान आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शेखर निकम म्हणाले चिपळूण मतदारसंघात पक्षाचा आमदार नाही व राज्यात सत्ता नसल्याने विकासकामे करताना पुरेसा निधी मिळत नाही. मात्र, पक्षाचे नेते खा. शरद पवार यांनी आपल्या भागासाठी निधी देण्याचे मान्य केल्याने विविध विकासकामे मार्गी लागण्यास मदत होईल. यापुढे शिक्षण, पाझर तलाव, तरुणांना रोजगार, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, महिलांचे आरोग्य, उधोगधंद्याची निर्मिती यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही निकम यांनी यावेळी दिली. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी बेसिक युवक कमिटी सदस्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.