Fri, Apr 19, 2019 12:46होमपेज › Konkan › गतवर्षीपेक्षा धरणांमध्ये ७ टक्के जादा जलसाठा

गतवर्षीपेक्षा धरणांमध्ये ७ टक्के जादा जलसाठा

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 8:15PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाने समाधानकारक सातत्य ठेवले असूून जिल्ह्यातील तीन मध्यम आणि 62 लघु पाटबंधारे प्रकल्पांत 390.34 द. ल. घ. मी. उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये सात टक्यांनी हा पाणीसाठा वाढला असून  सध्या या प्रकल्पामध्ये 86 .5 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावाधीत 79.22 टक्के  इतका पाणीसाठा होता. 

दरम्यान, जिल्ह्यात पावसाने  सरासरी 3000 मि. मी. कडे वाटचाल सुरू केली असून जिल्ह्यातील 65 पैकी  44 धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. यामध्ये राजापुरातील अर्जुना या मध्यम प्रकल्पाचाही समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या श्रावणसरींनी जोर धरला आहे. मात्र , गतवर्षाच्या तुलनेत पावसाने चारसे  मि. मी. सरासरी आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 26 हजार 279. मि. मी. एकूण पाऊस झाला आहे तर पावसाने 2919 मि. मी. ची सरासरी गाठली आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 22 हजार 268 मि.मी. पाऊस झाला होता तर सरासरी पर्जन्यमान 2474 एवढे होते. 

सरासरीच्या तुलनेत यावर्षी पावसाने चारशे मि.मी.ची जादा मजल घाटली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील धरण क्षेत्राला झाला असून धरणातील पाणीसाठी गतवर्षाच्या तुलनेत 7 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील 44 धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे. दरम्यान, आगामी काळात असाच पाऊस सुरू राहिल्यास  जिल्ह्यातील आणखी दहा धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. या धरणांमध्ये सध्या 90 टक्के पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील 100 टक्के भरलेली धरणे

मंडणगड- पणदेरी, चिंचाळी, तुळशी, दापोली -सोंडेघर, सुकोंडी, आवाशी, टांगर खेड - शिरवली, शेलडी, कुरवळ, शेलारवाडी गुहागर -गुहागर, चिपळूण - तिवरे, मालघर, कळंवडे, अडरे, खोपड, मोरवणे, आंबतखोल, आसुर्डे,  राजेवाडी, संगमेश्‍वर- मोर्डे, तेलेवाडी, निवे, कडवई, रांगव. रत्नागिरी- शिळ, लांजा- शिपोशी व्हेळ, गवाणे, झापडे, बेणी, मुचकुंदी,  हर्दखळे, इंदवटी, कुवे. राजापूर - दिवाळवाडी, बालेवाढी, ओझर, चिंचवाड़ी, कोंड्ये, गोपाळवाडी, वाटूळ आणि  अर्जुना (मध्यम प्रकल्प ).