Tue, Sep 17, 2019 22:00होमपेज › Konkan › खासगी बस उलटून ७ प्रवासी जखमी

खासगी बस उलटून ७ प्रवासी जखमी

Published On: May 20 2019 2:07AM | Last Updated: May 20 2019 2:07AM
नाणीज : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील कापडगावच्या हॉटेल रोनीतनजीकच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने खासगी बस उलटून 7 प्रवासी जखमी झाले. हा अपघात रविवारी पहाटे 4 वाजता झाला. जखमींवर पाली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबतची माहिती अशी : गजांतलक्ष्मी ट्रॅव्हल्सची बस (एमएच 07 एई 2121) बोरिवलीहून शिरोड्याला चालली होती. कापडगावच्या हॉटेल रोनीतनजीक वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी बाजूपट्टीवरून खाली

जाऊन बाजूच्या नाल्यात उलटली. त्यात 7 जण जखमी आहेत. त्यात चार महिलांचा समावेश आहे. अन्य किरकोळ जखमींवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. गाडीत एकूण 24 प्रवासी होते. या अपघातात गाडीचा चालक उमेश मधुसूदन उद्धव (29, रा. कणकवली),  उदय मेघःश्याम गावडे (40, रा. वेगुर्ला), विशाल हरिचंद्र रामाणे (29, रा. मुंबई), लॉरेन्स अँथनी रॉड्रिक्स (73, रा. वेंगुर्ला), तेरेजीन अ‍ॅलेक्स फर्नांडिस (52, रा. मुंबई), अ‍ॅलेक्स संतान फर्नांडिस  (52, रा. मुंबई), रीटा थॉमस माँटेरो (68, रा. वेंर्गुला)आदी जखमी झाले. अपघाताचा तपास पाली ग्रामीण दूरक्षेत्राचे संजय झगडे व त्यांचे सहकारी करीत आहेत.