Tue, Mar 26, 2019 20:16होमपेज › Konkan › दिव्यांग मेळाव्यात ५०० दिव्यांगांची तपासणी

दिव्यांग मेळाव्यात ५०० दिव्यांगांची तपासणी

Published On: Mar 24 2018 1:50AM | Last Updated: Mar 23 2018 9:13PMकुडाळ : शहर वार्ताहर

कुडाळ पंचायत समिती आयोजित दिव्यांग मेळाव्याला शुक्रवारी  तालुक्यातील  दिव्यांग बांधवांनी लक्षणीय  उपस्थिती दर्शविली. या मेळाव्याचा  500 दिव्यांगांनी लाभ घेतला. 

महालक्ष्मी  हॉलमध्ये  आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन  सभापती राजन  जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. उपसभापती सौ. श्रेया परब, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, जि.प.सदस्या वर्षा कुडाळकर, पं.स. सदस्या सौ. प्राजक्‍ता प्रभू, सौ. मथुरा राऊळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश  कांबळे, ओरोस  सरपंच  सौ. प्रीती  देसाई आदीसह तालुक्यातील सुमारेे 700 हून  अधिक दिव्यांग बांधव व त्यांचे पालक उपस्थित होते.

मेळाव्यासाठी सकाळी 9 वा. ची वेळ देण्यात आल्याने सकाळपासूनच  तालुक्यातील दिव्यांग बांधव आले होते. मात्र,  मुख्य उद्घाटनाचा कार्यक्रम  अडीच तासाच्या विलंबाने 11.45 वा. सुरू झाला. तत्पूर्वी उपस्थित दिव्यांग बांधवांची नोंदणी  करण्यात आली होती.  गटविकास अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात अशाप्रकारचा हा प्रथमच  भरगच्च मेळावा होत आहे.  केवळ  उद्घाटनाचा  कार्यक्रम लांबला म्हणून कोणाचीही  गैरसोय होणार नाही. प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे. ग्रा.पं.कडून या मेळाव्याची कल्पना  दिली गेली नसेल अशांनी आपल्याशी संपर्क साधावा,  असे आवाहन  त्यांनी केले.

सभापती जाधव यांनी अध्यक्षीय  भाषणात दिव्यांग बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून जीवनात यशस्वी व्हावे, असे सांगितले. उपसभापती सौ. परब यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. कांबळे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन  आरोग्य सेवक  प्रकाश तेंडोलकर  यांनी केले.  दिव्यांग बांधवांनी आरोग्य विषयक तपासणी  करण्यात आली.

दिव्यांगांचा गौरव 

यावेळी दिव्यांगावर मात करून  यशस्वी झालेल्या  दिव्यांग बांधवांचा  मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देवून गौरव  करण्यात आला. यामध्ये श्यामसुंदर  लोट, विजय कदम, गुरूनाथ सामंत, सुरेखा सरवणकर, लवू परब, रामदास सावंत, गणपत  चव्हाण, मारूती तेली, सुषमा  सडवेलकर, भाग्यश्री चव्हाण, मेघा कलकटे, शुभम नाईक, मनिषा टिळवे, विक्रांत पालव, गणपत तेली,  सुभाष वेतोरेकर, नीलिमा माळवे, नागेश जाधव, उत्कर्षा पालव, सिध्दी कदम, रामचंद्र परब, सुनील जाधव, विशाखा परब, गीतांजली परब, कुणाल कानडे, अश्‍विनी परमार, विश्‍वनाथ वालावलकर, प्रणिता कोटकर, अलिशा फेराव, अर्चना   सावंत, रसिका राणे यांचा  सत्कार करण्यात आला.  

 

Tags : sindhudurg, kudal news, handicap, handicap Checkup, handicap Melawa,