Wed, May 22, 2019 23:26होमपेज › Konkan › म्हापण, कोचरा, खवणे येथील 50 जणांचा भाजपात प्रवेश

म्हापण, कोचरा, खवणे येथील 50 जणांचा भाजपात प्रवेश

Published On: Feb 08 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 9:07PMवेंगुर्ले ः प्रतिनिधी 

अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा कार्यकर्ता मेळावा सावंतवाडी येथील राजवाड्यामध्ये झाला. या मेळाव्यात वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावच्या माजी सरपंच ऋतुजा मेस्त्री, कोचरा गावचे माजी उपसरपंच चंद्रकांत राऊळ, खवणे येथील मनोहर कोचरेकर यांनी  50 महिला-पुरुष कार्यकर्त्यांसहीत भाजपात प्रवेश केला.

जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आम.अ‍ॅड. अजित गोगटे, प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल, विजयकुमार मराठे, जयदेव कदम, राजू राऊळ, जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा अन्‍नपूर्णा कोरगावकर, विलास हडकर, मनोज नाईक, विस्तारक पंकज बुटाला, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश सारंग, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, प्रवक्ते काका कुडाळकर, बांदा सरपंच मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.

 भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये म्हापण येथील माजी सदस्य रेवती गोडे, प्रगती राऊळ, माधवी तळावडेकर, नम्रत गावडे, प्रतिमा गवंडे, शिल्पा परब, पार्वती परब, सुखदा गावडे, सुमित्रा परब, संजिवनी परब, सुलोचना परब, लक्ष्मी परब, रेश्मा परब, सारिका परब, हर्षदा परब, सुरेखा परब, प्रणाली परब, सुरेखा राऊळ, अनिता परब, चंद्रभागा परब, दीपाली परब, शुभांगी परब, साक्षी परब, मीनाक्षी परब, रुचिता परब, योगेश हंजनकर, राजेश मेस्त्री, दिलीप परब, रवी म्हापणकर, दिलीप राऊळ, संतोष परब, प्रदीप परब, इच्छाराम केळुसकर, विकास परब, कैलास परब, रोशन मार्गी, ऐश्वर्या परब, प्रशांत परब, प्रमोद परब, गणेश गडकरी आदी म्हापण, खवणे, मळई, पागेरेवाडी, भूतकोंडवाडी व कोचरा-मायनेवाडीतील सुमारे 50 कार्यकर्ते होते.