Mon, Aug 19, 2019 15:19होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात ३ वाजेपर्यंत ५०.१६ टक्के मतदान

सिंधुदुर्गात ३ वाजेपर्यंत ५०.१६ टक्के मतदान

Published On: Apr 23 2019 5:14PM | Last Updated: Apr 23 2019 5:14PM
ओरोस : पतिनीधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी दु. ३ वाजेपर्यंत ५०.१६ टक्के एवढे मतदान झाले आहे. ६ लाख ६६ हजार ७२० मतदारांपैकी ३ लाख ३४ हजार ४५१ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

यामध्ये १ लाख ७३ हजार ६६६ पुरुष व १ लाख ६० हजार ६८५ महिला मतदारांनी मतदान केले आहे. अजून एक तास शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित ५० टक्के मतदारांपैकी किती मतदार मतदानाचा हक्क बजावतात यावर जिल्ह्याच्या एकूण मतदानाची टक्केवारी निश्चित होणार आहे.