Wed, Nov 14, 2018 12:11होमपेज › Konkan › ५ जणांनी विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

५ जणांनी विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 8:01PMअलिबाग : प्रतिनिधी

दिल्‍ली येथील एकाच कुटुंबातील 11 जणांची आत्महत्या, मुंबई येथील 14 वर्षीय विद्यार्थिनीची आठव्या मजल्यावरून आत्महत्या, अशा अलीकडच्या आत्महत्यांच्या सत्रांनी खळबळ उडालेली असताना हे लोण रायगड जिल्ह्यातही येऊन पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. दोन लहान मुलांसह एकाच कुटुंबातील 5 जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून सर्वांवरच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील एकाच 

कुटूंबातील 5 जणांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 2 महिला, 1 पुरुष तर 2 चिमुकल्याचा समावेश आहे. विष प्राशन केलेल्या 5 ही जणांना जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणण्यात आले. यातील दोन चिमुकल्यांसह त्यांच्या आईला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. एकाच कुटूंबातील 5 जणांच्या विषबाधेमुळे आक्षी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, या कुटूंबाने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याबाबतचे कारण अद्याप कळलेले नाही.

रामचंद्र पाटील (60), रंजना पाटील (50), कविता पाटील (25), स्वराली पाटील (दीड वर्ष ), स्वराज पाटील (दीड वर्ष) अशी विष प्राशन केलेल्यांची नावे आहेत. रामचंद्र पाटील हे व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. तर त्याचा मुलगा राहुल पाटील हा ठाणे रबाळे येथे कामधंद्यानिमित्त राहत असतो. तर घरी रामचंद्र, पत्नी, सून व 2 नातवंडे असे आक्षी येथे राहत आहेत. 3 जूनच्या रोजी रात्री उशिरा त्यांनी त्याची पत्नी, सून व 2 नातवंडे यांनी शेतीला वापरण्यात आलेले 

विश्वास हे विषारी औषध शितपेयात घेऊन प्राशन केले. पाटील कुटूंब दुपार झाली तरी उठले नाही म्हणून बाजूच्या आजीने समोरच्यांना बोलावून दरवाजा उघडण्यास सांगितला. घराचा दरवाजा उघडल्यानंतर दोन चिमुकले रडत असून घरातील 3 जण बेशुद्ध अवस्थेत घरात पडले असल्याचे दिसले. त्यानंतर शेजारी यांनी आक्षीचे माजी सरपंच यांना बोलावून सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

पाचही जणांपैकी रंजना व रामचंद्र यांची प्रकृती स्थिर आहे. सून कविता हिची तब्येत नाजूक असल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवून तर स्वराज याच्या मेंदूपर्यत विषाचा प्रयोग झाला असल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे. स्वराली हिची तब्येत ठीक असली तरी तिलाही मुंबईत हलविले आहे.ही घटना कळताच उपविभागीय अधिकारी डी. बी. निघोट व अलिबाग पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.