Sun, Aug 18, 2019 20:50होमपेज › Konkan › कुडाळातील भूधारकांना ३०७ कोटींचे वाटप 

कुडाळातील भूधारकांना ३०७ कोटींचे वाटप 

Published On: Aug 17 2018 10:34PM | Last Updated: Aug 17 2018 9:57PMकुडाळ ः वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कुडाळ विभागातील 18 गावातील भूधारकांना आतापर्यंत 306 कोटी 79 लाख रू. रक्‍कम वितरीत करण्यात आली आहे. कुडाळमधील 73 हेक्टर क्षेत्रापैकी 59 हेक्टर क्षेत्रातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असूनही जमिनी संबंधित ठेकेदाराकडे वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कुडाळ भूसंपादन विभागातून देण्यात आली आहे.  गेल्या सहा महिन्यांत कुडाळमधील मोबदला वितरण प्रक्रिया काहीशी मंदावली असून हरकतीची सुनावणी यासारख्या कारणांमुळे उर्वरीत निधी वितरण राखल्याचे या विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांचे काम पावसाळ्यामुळे थांबले आहे. मात्र जमीन संपादन प्रक्रिया व इतर शासकीय स्तरावरील कामे सुरू आहेत. यामध्ये हरकतीनुसार दुरूस्त केलेल्या प्रस्तावांची थ्रीडी तयार करून त्यांना मंजुरी घेणे यासारख्या  कामांचा सामावेश आहे. कुडाळ तालुक्यात 30 कि.मी. महामार्गाचा भाग येत आहे. यामध्ये 73 हेक्टर जमिनीचा समावेश आहे. यातील 59 हेक्टर क्षेत्र कुडाळ भूसंपादन विभागाकडून संपादित करण्यात आले आहे. अद्याप 13 हेक्टर क्षेत्राचा ताबा संबंधित ठेकेदाराकडे चौपदरीकरणासाठी देण्यात आला आहे. कुडाळ तालुक्यासाठी 388 कोटी 68 रुपये मंजूर असून यापैकी 306 कोटी 79 लाख रू.चे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. संपादन करायच्या एकूण क्षेत्रापैकी उर्वरीत 13.56 हेक्टर क्षेत्राची अधिसूचना शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कुडाळ विभागात प्राथमिक टप्प्यात 146 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. याचे वितरण वर्षाच्या आत पूर्ण करण्यात आले होते. यानंतर सुमारे 100 कोटी व त्यानंतर 146 कोटी रु. निधी मंजूर करण्यात आला होता. यातील कसाल कुडाळसाठी 100 कोटी रू. निधी मागाहून मंजूर करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे दुसर्‍या टप्प्यातील निधीचे वितरण काही प्रमाणात रखडले आहे. तालुक्यातील आतापर्यंत मंजूर निधीपैकी 82 कोटी रु.शासनाकडे  जमा आहेत. दुसर्‍या टप्प्यातील निधीपैकी 160 कोटी रु. सहा ते आठ महिन्यात वितरीत करण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी गेल्या काही महिन्यांपासून कुडाळ विभागातील निधी वितरण व भूसंपादन प्रक्रिया काहीशी रखडलेली दिसत आहे.  कुडाळ विभागात सुमारे 13 हेक्टर क्षेत्र संपादित करणे बाकी आहे. यावरून  विभागात निधी वितरण व

भूसंपादन प्रक्रिया काहीशी रखडल्याचे स्पष्ट आहे. अनेक खातेधारकांच्या जमिनीबाबत शासनदरबारी सुनावणी सुरू असून त्याचा निकाल  प्रलंबित आहे. मात्र, ज्यांचे निकाल लागले त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे  भूसंपादन अधिकारी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले.