Thu, Jul 09, 2020 06:28होमपेज › Konkan › सरोवर संवर्धनासाठी ३.५५ कोटी सुपूर्द

सरोवर संवर्धनासाठी ३.५५ कोटी सुपूर्द

Published On: Dec 17 2017 1:27AM | Last Updated: Dec 16 2017 10:53PM

बुकमार्क करा

दापोली : प्रतिनिधी

दापोली तालुक्यामध्ये आणि दापोली मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी पुरातन सरोवर असून या सरोवरांची  देखभाल किंवा दुरुस्ती शासनाकडून आजपर्यंत झाली नव्हती. याबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली मतदारसंघातील सरोवरांची दखल घेऊन तालुक्यातील गिम्हवणे, जालगाव, मुरुड, गावतळे, विरसई, उटंबर, कुंभार्ले, मंडणगड, आदी ठिकाणच्या सरोवरांसाठी 3 कोटी 55 लाख इतका निधी मंजूर केला आहे. या सरोवरांसाठी मंजूर झालेला हा निधी तालुक्यातील ज्या गावांमध्ये हे सरोवर आहेत. त्या गावातील सरपंचांकडे हा निधी सुपूर्द करण्यात आलाआहे. हा निधी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुंबई येथे तालुक्यातील सरपंचांकडे सुपूर्द केला.

यावेळी युवा कार्यकारिणी सदस्य योगेश कदम, दापोली तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, समाज कल्याण सभापती चारुता कामतेकर, सुनील दळवी, दापोली शहरप्रमुख सुहास खानविलकर, दापोलीचे तहसीलदार कविता जाधव, दापोली गटविकास अधिकारी राऊत, जि. प. सदस्य अनंत करबेले, माजी सभापती श्रीपत पवार, एन. वाय. पवार, गावतळे सरपंच सेजलपवार, संतोष पवार, रामचंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.