Sat, Apr 20, 2019 09:54होमपेज › Konkan › जिल्ह्यातील वनराई बंधार्‍यांचे २६ पूर्वी पुनर्सर्वेक्षण करणार

जिल्ह्यातील वनराई बंधार्‍यांचे २६ पूर्वी पुनर्सर्वेक्षण करणार

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 10:19PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेंतर्गत  या वर्षी 7 हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी 26 जानेवारी ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. त्यानंतर उद्दिष्ट पूर्ततेसाठी बंधारे उभारल्यास आणि ते  कोरडे राहिल्यास संबंधितांवर कारवाईचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या बंधार्‍यांचे पुनर्सर्वेक्षण) करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. 

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजनेत 2012 पासून लोकसहभागातून वनराई बंधारे  उभारण्याची मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये वन विभाग, सामाजिक वनिकरण आणि कृषी विभाग असा शासकीय स्तरावर सहभाग घेताना त्यामध्ये महाविद्यालयीन युवक,  ग्रामस्थ असा लोकसहभाग घेण्यात येतो. यावर्षी (17-18) पावसाने सरासरी गाठल्यानंतर बंधार्‍यांचे नियोजन करताना जिल्ह्यात सात हजार बंधार्‍यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

मात्र, आतापर्यंत केवल तीन हजार  बंधारे  उभारण्यात आले. अद्यापही उद्दिष्टापासून दूर असल्याने आता या अभियानात 26 जानेवारीपर्यंत उद्दिष्ट पूर्तता करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाळा संपता संपता या कामांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत नद्या-नाले आटू लागल्यानंतर बंधारे उभारल्यास बंधारे कोरडे राहतात. त्यामुळे  उद्देश सफल होत नाही. त्यामुळे केवळ उद्दिष्ट गाठण्यासाठी बंधारे उभारणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाने यामध्ये प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. सर्वेक्षण करताना बंधार्‍यांचे पुनर्सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये बंधार्‍यांची लांबी, त्याची पाझरता आणि स्थळ याची पाहणी करण्यात येणार आहे.