Mon, Mar 25, 2019 13:14होमपेज › Konkan › 24 बालवैज्ञानिक ‘इस्त्रो’ सफरीसाठी रवाना

24 बालवैज्ञानिक ‘इस्त्रो’ सफरीसाठी रवाना

Published On: Jun 19 2018 10:47PM | Last Updated: Jun 19 2018 10:23PMओरोस : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जि. प. आयोजित डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेतील 24 गुणवंत विद्यार्थी बाल वैज्ञानिकांन मंगळवारी  इस्त्रो सफरीसाठी रवाना झाले. विद्यार्थ्यांची ही सफर म्हणजे जि. प. च्या इतिहासातील उल्लेखनिय कामगिरी असल्याचे मत जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी व्यक्‍त केले. या सर्व विद्यार्थ्यांना या सहलीसाठी जि. प. च्या खर्चाने हवाई प्रवास घडविण्यात येणार आहे. 

 चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा बंद झाल्याने या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग जि. प. ने डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम प्रज्ञा शोध परीक्षा हा उपक्रम गतवर्षा पासूमन सुरु केला आहे. या परीक्षेत प्रत्येक तालुक्यातून प्रथम तीन विद्यार्थ्यांना त्रिवेंद्रम येथे ‘इस्त्रो’ या वैज्ञानिक संस्थेची सफर घडवून आणली जाणार आहे. मंगळवारी या सफरीसाठी सिंधुदुर्गातून हे 24 बाल वैज्ञानिक या  सफरीसाठी रवाना झाले. जि. प. च्यावतीने जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, गटनेते जि. प. सदस्य सतीश सावंत, श्री. आंगणे, पालव, शिक्षणाधिकारी कडूस आदींसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. 

मंगळवारी हे 24 विद्यार्थी त्रिवेंदम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या इस्त्रो या वैज्ञानिक संस्थेला भेट देण्यासाठी रवाना झाले.  गोवा ते हैद्राबाद आणि हैद्राबाद ते त्रिवेंदम असा विमान प्रवास करुन हे विद्यार्थी त्रिवेंद्रम येथे पोहोचणार आहेत. इस्त्रोच्या भेटीनंतर विद्यार्थी कन्याकुमारी येथील जगप्रसिद्ध स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देणार आहेत. 23 जून रोजी ही टीम सिंधुदुर्गात पुन्हा परतणार आहे.  परतीचा प्रवास ही टीम रेल्वेने  करणार आहे. या टीमसोबत जि. प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश कांबळे आदी रवाना झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.