Tue, Jul 16, 2019 22:01होमपेज › Konkan › कुडाळ तालुक्यात २२ लेप्टो तर ४३ लेप्टोसदृश्य रुग्ण

कुडाळ तालुक्यात २२ लेप्टो तर ४३ लेप्टोसदृश्य रुग्ण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुडाळ : शहर वार्ताहर

कुडाळ तालुक्यात आतापर्यंत 22 लेप्टोबाधीत तर 43 लेप्टोसदृश्य तापाचे रुग्ण आढळले आहेत. 34 हजार 206 कुटुंबांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून यात 925 नियमित तापाचे तर 36 विशेष तापाचे रुग्ण आढळले असून एकुण 14 हजार 724  जोखीमग्रस्त  लोकांना प्रतिबंधात्मक गोळ्यांचा पुरवठा केला असून तापसरीची साथ पूर्णपूर्ण आटोक्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी पं.स. बैठकीत दिली.

कसालच्या विकासकामासाठी पं.स.च्या बजेटमधून  खास 1 लाख रु.चा निधी देण्याचे सभापती जाधव यांनी यावेळी जाहीर केले. संसद खासदारांमध्ये टॉप 10 मध्ये प्रथम क्रमांक मिळविलेले बारामतीचे खासदार व 10 वा क्रमांक मिळविलेलेले  खा. विनायक राऊत यांच्या अभिनंदनाचा ठराव जयभारत पालव यांनी मांडला. जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत पुरस्कारासाठी  निवड झालेल्या तुळसुली व शिवापूर या ग्रा.पं.च्या अभिनंदनाचा ठरावा मिलिंद नाईक यांनी मांडला. तापसरीच्या काळात तालुका आरोग्य  अधिकारी व त्यांच्या टिमने परिश्रम घेवून रूग्णांना चांगली सेवा दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव तसेच गरीबांच्या घरांना दुरूस्तीसाठी निधी मिळण्याबाबतचा ठराव अरविंद  परब यांनी मांडला. लेप्टो व तापसरीने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळण्याबाबतचा ठराव डॉ. सुबोध माधव यांनी मांडला.

बंधारे व एमआरजीएसची  कामे याबाबत सभापती जाधव  व गटविकास  अधिकारी विजय चव्हण यांच्या अभिनंदनाचा ठराव अनुक्रमे सौ. प्राजक्‍ता प्रभू व सौ. स्वप्ना वारंग यांनी मांडला. तालुक्यातील सर्व शाळांची पाहणी करून याबाबतची  यादी शिक्षणाधिकार्‍यांकडे पाठवावी व जीर्ण शाळांचेच प्रस्ताव प्राधान्यक्रमाने मंजुरीला पाठवावेत, असा ठरावा अरविंद परब यांनी मांडला.

या सभेत पं.स.च्या सेस जमा खर्चाचा मूळ व सुधारीत अंदाजपत्रकास सभागृहात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अपघातातील जखमींचे प्राण वाचवल्याबद्दल  एनआरएलएमचे संदीप भोळे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विद्यमान नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.