Tue, Nov 13, 2018 23:33



होमपेज › Konkan › मालवणमध्ये सापडल्या २० लाखाच्या जुन्‍या नोटा, ४ जण ताब्यात

मालवणमध्ये सापडल्या २० लाखाच्या जुन्‍या नोटा, ४ जण ताब्यात

Published On: Apr 30 2018 7:57PM | Last Updated: Apr 30 2018 7:57PM



मालवण : प्रतिनिधी

मुंबईहून मालवण येथे येणाऱ्या  मुंबई स्थित व्यक्तीच्या कारमध्ये चलनातून रद्द झालेल्या सुमारे ५० लाख रूपयाच्या जुन्यानोटाची रोकड सापडल्याची घटना सोमवारी दुपारी सुकळवाड पाताडेवाडी येथे घडली. याप्रकरणी मालवण पोलिसांनी सुधीर शांताराम खामकर, (वय ५३) लांजा रत्नागिरी, मारुती तुकाराम मुटल (वय ४८बेलापुर ठाणे), नितिन नंदकुमार गावडे (वय ३३ घनसोल नवी मुंबई), बीरबल कुमार गुप्ता (वय २१ विक्रोळी)  या चौघाना ताब्यात घेतले आहे. सायंकाळी उशीरा त्यांच्यावर मालवण पोलिसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. मालवण पोलिसस्थानकाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक अमोल साळूखे ,यांनी गुप्त हेराच्या सहाय्याने ही करवाई केली. मालवणाला नोटाबंदी पूर्वीच्या जुन्या नोटा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सदर नोटा कोणत्या कारणासाठी आणलेल्या त्या नोटा कुठे नेत होत्या याबाबत संबंधिताकडून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.

मुंबई येथील काही व्यक्‍ती मुंबईहुन मालवणच्या दिशेने हुंडई कार मधून जुन्या नोटाची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मालवण पोलिसांना मिळाली. त्यानुसार मालवण पोलिसांचे पथक ओरोसच्या दिशेने निघाले. आज दुपारी ३ च्या सुमारास सुकळवाड बाजारपेठ पासून १ कि.मी अंतरावरिल पाताडे वाडी येथे (एम एच ०३बी सी.५९२९) ही कार मालवण पोलिसांना आढळून आली. या कराची तपासणी केली असता कारमधील सीटवर प्लास्टिक च्या पिशावीमध्ये एक हजार रूपयाच्या सुमारे ५० लाख रूपयाच्या नोटा आढळून आल्या. कारमधील सुधीर खामकर, मारुती मुटल, नितिन गावडे, बीरबल कुमार गुप्ता, या चौघाना कारसह  ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही करवाई पोलिस उपनिरीक्षक अमोल साळूखे, मंगेश माने, व्हिलसन फर्नाडीस, व खड़पकर यांनी केली.

मंगळवारी या गुह्याच्या चौकशी साठी कोल्हापूर येथील इन व्हेस्टीकेशन डिपार्टमेंट चे पथक येणार आहे.