Thu, Jul 18, 2019 21:13होमपेज › Konkan › 20 किलो पिशव्या जप्‍त

20 किलो पिशव्या जप्‍त

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 24 2018 11:03PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

प्‍लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या दोन पथकांनी शनिवारी 20 किलो प्‍लास्टिक पिशव्या जप्त केल्या. त्याचबरोबर र.न.प.कडून ध्वनिक्षेपकाद्वारे प्‍लास्टिक आणि थर्माकोल साहित्य न वापरण्याबाबत जनजागृती करण्यासही शनिवारीच सुरूवात झाली आहे.

शासनाने प्‍लास्टिक बंदी लागू केल्यानंतर नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी व्यापारी, विक्रेत्यांना काही दिवस संधी म्हणून स्थापन केलेल्या दोन पथकांकडून तपासणी करून प्‍लास्टिक पिशव्या व थर्माकोल साहित्य जप्त करण्यात येणार असल्याचे शुक्रवारी सांगितले. त्यानुसार रनपच्या दोन पथकांनी शनिवारी आठवडा बाजार आणि इतर बाजारांच्या ठिकाणी फिरून विक्रेत्यांना विकण्यास आलेल्यांकडून प्‍लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या.नागरिकांकडूनही सहकार्य मिळावे, यासाठी ध्वनिक्षेपकावरून प्‍लास्टिक बंदी अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन रनपकडून केले जात आहे. पुरेशी संधी दिल्यानंतर दंडात्मक कारवाई सुरू केली जाणार आहे. 500 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले.

सेनेकडून पर्यावरणपूरक पिशव्यांचे होणार वाटप

शिवसेनेकडून पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे. 15 हजार पर्यावरणपूरक पिशव्या टप्प्याटप्प्याने वाटल्या जाणार असल्याचे आ. उदय सामंत यांनी सांगितले.