Thu, Mar 21, 2019 23:23
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › सौभाग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात २० कोटींचा प्रकल्प

सौभाग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात २० कोटींचा प्रकल्प

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 7:58PM

बुकमार्क करा

कुडाळ : वार्ताहर 

महावितरणच्या वतीने पंतप्रधान हर घर बिजली म्हणजे सौभाग्य योजनेअंतर्गत आता घरा घरात वीजजोडणी देण्यात येणार आहे.मागेल त्याला वीजजोडणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 20 कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.याअनुषंगाने आठवडाभरात 250  वीजजोडण्या देण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी दिली आहे 

महावितरणने स्वपातळीवर सौभाग्य योजना राबविण्याच्या घेतलेल्या निर्णयात बीपीएल कार्डधारकांना मोफत तर एपीएल कार्डधारकांना 500 रूपये वीजजोडणीसाठी घेण्यात येणार आहेत. मात्र, हे पैसे रोखीने न घेता वीजग्राहकांच्या वीजबिलातून वजा करून घेण्यात येणार आहेत.

महावितरणने सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी या योजनेअंतर्गत 3554 वीजजोडण्या देण्याचे निश्‍चित केले आहे.तर आठवडाभरात 250 वीजजोडणी दिल्या जाणार आहेत.ग्राहकांकडून अर्ज येतील त्यांना वीजजोडणी देण्याबरोबर प्रत्येक घरात वीजजोडणी देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर पत्र-व्यवहार या योजनेची माहीती देण्यात येणार आहे.अशा लाभार्थीची नावे कळविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत तसेच जनमित्र, वायरमन यांनाही ज्या ग्राहकांकडे वीज नाही अशांचे अर्ज घेवून महावितरकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

सबंधित ग्राहकांकडून साधा अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.त्यांना तातडीने वीजजोडणी देण्यात येणार आहे. शहरातील ज्या बीपीएल , अंत्योदय कार्डधारकांकडे वीजजोडणी नाही त्यांनी त्वरित अर्ज करून वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे.