Thu, Jun 27, 2019 13:42होमपेज › Konkan › वार्षिक योजनेचा 189 कोटींचा निधी मंजूर

वार्षिक योजनेचा 189 कोटींचा निधी मंजूर

Published On: Mar 08 2018 10:35PM | Last Updated: Mar 08 2018 10:04PMसिंधुनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामांच्या याद्या  पालकमंत्र्यांनी मंजूर करून न दिल्यामुळे जिल्हा नियोजन विभागाकडील जिल्हा वार्षिक योजनेतील या वर्षीचा मोठा निधी अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2017-18 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच निधी उपलब्ध झाला आहे; मात्र, कामांच्या याद्या मंजूर न झाल्यामुळे गेले सहा महिने विविध यंत्रणांचे काम ठप्प आहे. मार्चअखेर अखर्चित राहिलेला निधी परत जाऊ नये म्हणून अखेर यंत्रणांकडे वळता केला जातो व शंभर टक्के खर्च झाल्याचे भासविले जाते. पुढील 2018-19 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा 

189 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने मंजूर केला आहे. जिल्हा वार्षिक आराखड्याचा या वर्षीचा 159.43 कोटी रुपयांचा निधी वर्षाच्या सुरुवातीलाच उपलब्ध झाला होता. मात्र, या निधीतून होणार्‍या जिल्ह्यातील विकासकामांच्या याद्या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंजूर केल्या नाहीत. या वर्षात मार्गी लागू शकणारी  विविध विकासकामे मंजुरीच्या सोपस्कर अभावी रेंगाळत पडली आहेत. 31 मार्च काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अखेर क्षणी हा निधी यंत्रणांकडे वळता करून शंभर टक्के निधी खर्च झाल्याची घोषणा केली जाते. 
160 कोटी वर्षांच्या सुरुवातीलाच उपलब्ध झाले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात काळात कामे पूर्ण ठप्प असतात. मात्र, या काळात या कामांच्या मंजुरीबाबत प्रशासकीय बाबी पूर्ण होणे आवश्यक असते. याद्या या काळात मंजूर झाल्याच्या तर प्रशासकीय बाबी पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली असती व जिल्हयाच्या विकासालाही गती मिळाली असती. मार्चअखेर संपणार्‍या शेवटच्या पाच सहा महिन्यात कामे पूर्ण करणे संबंधित यंत्रणा व संबंधित ठेकेदारांनाही सोयीचे ठरणारे असते. मात्र, यावर्षी विकास कामांच्या मंजुरीला खूपच दिरंगाई झाली आहे.