Mon, Jun 24, 2019 17:26होमपेज › Konkan › सागरी मासेमारीसाठी 17 कोटी

सागरी मासेमारीसाठी 17 कोटी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनधी

मत्स्य योजनांचा समावेश कृषी अंतर्गत करण्यात आल्यानंतर ‘नीलक्रांती’ योजनेअंतर्गत कोकण किनारपट्टी भागात मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी पारंपरिक मच्छीमारांना सागरी मासेमारी करण्यासाठी अत्याधुनिक नौका देण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी कोकणाला  ‘नीलक्रांती’ योजने अंतर्गत 17 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही योजना राज्यात कोकण विभागासाठी  राबविण्यात येणार आहे.

पंतप्रधानांनी देशविकासासाठी जाहीर केलेल्या सप्तसूत्रांपैकी सातव्या सूत्रामध्ये श्‍वेतक्रांती, नीलक्रांती, कृषीक्रांती, ग्रामीण पोल्ट्री, शेतीचे विविधीकरण या बाबींवर भर दिला आहे. श्‍वेतक्रांतीचा विचार करता दुग्ध व्यवसायामध्ये सध्याची पशुखाद्याची मागणी 35 दशलक्ष मे. टनांची आहे असून 32 दशलक्ष मेट्रिक टनांची निर्मिती होत आहे. 2020 पर्यंत 45 दशलक्ष मे. टनांची आवश्यकता पडेल. त्यामुळे पशुखाद्य उत्पादक कंपन्यांसमोर तेवढे पशुखाद्य निर्माण करण्याचे आव्हान आहे. तीन नॅशनल ब्रीडिंग सेंटर मंजूर केली  आहेत. त्यांपैकी राज्यात  एक तयार झाले असून उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात प्रत्येकी एक ब्रीडिंग सेंटरची उभारणी होत आहे. 2017 पासून 1 कोटी 8 लाख दुधाळ पशुंना स्वास्थ्य कार्ड देण्याची योजना राबविली जात आहे.

देशी आणि वंशसुधारणा केलेल्या गायींची माहिती मिळावी, यासाठी पोर्टल तयार करण्यात आले असून आतापर्यंत 17 हजार पशुंची या पोर्टलवर नोंदणी झाली आहे. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी पारंपरिक मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करण्याच्या अत्याधुनिक मोठ्या बोटी देण्याची योजना राबविण्यात येत असून त्यासाठी तामिळनाडूसह महाराष्ट्रात कोकण विभागाला प्राधान्याने 17 कोटी दिले आहेत. ही योजना सागरकिनारा असलेल्या सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी एकात्मिक शेती करण्याबरोबरच पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन आदी व्यवसायांच्या आधारे आपली उन्नती साधण्यासाठी सप्तसूत्री योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘नीलक्रांती’ प्राधान्याने मत्स्य व्यवसायाच्या उन्नतीसाठी राबविण्यात येणार असून त्याचा फायदा कोकणातील पारंपरिक मच्छीमारांना होणार आहे. या योजनांसाठी मस्य आणि कृषी विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी केले आहे.

Tags : Konkan, Konkan News, 17 crore, Sea fishing, Neel kranti Scheme


  •