होमपेज › Konkan › कणकवलीत 16 केंद्रांवर मतदान 

कणकवलीत 16 केंद्रांवर मतदान 

Published On: Apr 05 2018 11:19PM | Last Updated: Apr 05 2018 11:07PMकणकवली : प्रतिनिधी

सहा इमारतींमध्ये 16 मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सौ. नीता सावंत-शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने, अवधुत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्याचबरोबर दोन क्षेत्रीय अधिकारीही नियुक्‍त करण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर पहिले चार नगराध्यक्षपदाचे उमेदवार नंतर त्या प्रभागातील नगरसेवकपदाचे उमेदवार असणार आहेत. शिवाय यंत्रावर ‘नोटा’ हे बटण असणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेशा प्रमाणात राखीव अधिकारी, कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.

तसेच आचारसंहितेचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी एक आणि भरारी पथक एक अशी दोन पथकेही नियुक्‍त करण्यात आली आहेत. तसेच जानवली आणि गडनदी या दोन नद्यांच्या मधोमध स्थिर सर्वेक्षण पथक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी नियुक्‍त केले आहे. हे पथक संशयित वाहनांची तपासणी करणार आहेत. कणकवली न. पं. साठी 12 हजार 525 मतदार आहेत. मात्र, प्रभाग क्र. 10 चे मतदान

11 एप्रिलला होणार असल्याने या प्रभागातील 709 मतदार वगळले तर 11 हजार 816 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.  12 तारीखलाच सर्व प्रभागांची मतमोजणी एकत्रितपणे होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सौ. नीता सावंत-शिंदे यांनी सांगितले. बंदोबस्तासाठी 15 अधिकारी, 91 पोलिस कर्मचारी नियुक्‍त राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणार्‍या कणकवलीत नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कणकवलीचे प्रभारी डीवायएसपी दयानंद गवस व वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्तासाठी 15 अधिकारी आणि 91 पोलिस कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्राच्या 100 मी. वर एक  अधिकारी, चार कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर आणि एक हत्यारबंद पोलिस असणार आहे. तसेच शहरात पेट्रोलिंगसाठी पाच गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तीन सेक्टरमध्ये तीन अधिकारी, एक व्हिडीओग्राफर, एक कॅमेरामन व एक हत्यारबंद पोलिस असणार आहे, अशी माहिती कणकवलीचे पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी दिली.

 

Tags : 16 Centers,  Kankavali,  Corporation Election