Thu, Nov 22, 2018 01:46होमपेज › Konkan › कोकणातील 150  ग्रा.पं. निवडणुका जाहीर

कोकणातील 150  ग्रा.पं. निवडणुका जाहीर

Published On: Aug 24 2018 12:44AM | Last Updated: Aug 23 2018 11:16PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणातील 150 ग्रामपंचायतींसाठी येत्या दि. 26 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दि. 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी आचारसंहिता जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी दि. 5 ते 11 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. दि. 12 रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. दि. 15 सप्टेंबर हा अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्याचदिवशी चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 26 रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. दि. 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.