Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Konkan › गणेशोत्सवासाठी १४ विशेष गाड्यांच्या फेर्‍या वाढवल्या

गणेशोत्सवासाठी १४ विशेष गाड्यांच्या फेर्‍या वाढवल्या

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 03 2018 7:43PMरत्नागिरी :  खास प्रतिनिधी

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर जाहीर केलेल्या गणपती विशेष गाड्यांपैकी 14 गाड्यांच्या फेर्‍या वाढवण्यात आल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवासाठी प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने आधी जाहीर केल्या गाड्यांपैकी 14 विशेष गाड्यांचा कालावधी विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या नुसार पुणे-सावंतवाडी  (01431) आधी 10 सप्टेंबरपर्यंत धावणार होती. आता ती 17 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. याचबरोबर सावंतवाडी - पुुुणे मार्गावरील विशेेष गाडी (01432) आधी 13 सप्टेंबरपर्यंत धावणार होती. आता तिच्या फेर्‍या 20 सप्टेंबरपर्यंत करण्यात आल्या आहेत. 

या शिवाय पुणे-सावंतवाडी (01447), सावंतवाडी - पनवेल (01448), पनवेल - सावंतवाडी (01433),  सावंतवाडी - पनवेल (01434), पनवेल-सावंतवाडी (01435), सावंतवाडी - पनवेल (01436), पनवेल-रत्नागिरी (01449),  रत्नागिरी - पुणे (01450),  पुणे- झाराप (01421), झाराप  - पुणे (01422), लो. टिळक टर्मिनस - सावंतवाडी (01095),  सावंतवाडी - लो. टिळक टर्मिनस (01096) या  गाड्यांच्या फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत.

दरम्यान,  गणेशोत्सव काळात  कोकण रेल्वे मार्गावरील 14 विशेष गाड्यांच्या फेर्‍या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने चाकरमान्यांचा गावी येण्यासाठीचा तसेच परतीचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. आधी 10 ते 16 सप्टेंबर  कालावधीसाठी जाहीर केलेल्या या गाड्या आता 17 ते 22 सप्टेंबरपर्यंत धावणार आहेत.