Thu, Feb 21, 2019 19:14होमपेज › Konkan › जिल्ह्यात १३९ दूषित पाणी नमुने

जिल्ह्यात १३९ दूषित पाणी नमुने

Published On: May 09 2018 2:05AM | Last Updated: May 08 2018 10:19PMओरोस : प्रतिनिधी

स्वच्छ जिल्हा म्हणून नावलौकीक मिळविलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुषीत पाण्याचे प्रमाण पाहता चिंतेची बाब बनली आहे. एप्रिल अखेर तपासण्यात आलेल्या 1380 पाणी नमुन्यांपैकी 139 पाणी नमुने दुषीत आढळलेले आहेत. ग्रामीण भागात 10.54 टक्के तर शहरी भागात दुषीत पाण्याचे प्रमाण 4.04 टक्के एवढे आहे. दुषीत पाण्याचे वाढते प्रमाण पाहता पाणी शुध्दीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेला फार महत्त्व दिले जात आहे. येथील जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तरीही काही पाण्याचे स्त्रोत दुषित होताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणेकडून पाण्याचे नमुने गोळा करून त्याची दरमहा तपासणी केली जाते. एप्रिल मध्ये तपासण्यात आलेल्या 1380 पाणी नमुन्यांपैकी तब्बल 139 पाणी नमुने दूषित असल्याचा अहवाल आरोग्य यंत्रणेकडे प्राप्त झाला आहे. यामध्ये सावंतवाडी तालुक्यात दुषित पाण्याचे प्रमाण (28 टक्के) सर्वाधिक आहे.