Sat, Nov 17, 2018 12:18होमपेज › Konkan › स्पिरिट प्रकरणातील दोघांना 13 पर्यंत पोलिस कोठडी

स्पिरिट प्रकरणातील दोघांना 13 पर्यंत पोलिस कोठडी

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 10:31PM

बुकमार्क करा
बांदा : वार्ताहर

बिलटीवर असलेल्या नमूद स्पिरिट ऐवजी दुसरेच स्पिरिट नेण्याचा प्रयत्न करणार्‍या टँकरला बांदा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडल्याने बनावट स्पिरिटचा पर्दाफाश झाला.याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यागरू विठ्ठल कृष्णाजी घाडगे (24,रा.कर्नाटक),परशुराम हनुमंत कुंतोजी (30,रा.कर्नाटक) या दोघांना आज  सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 13  जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.  

 हे स्पिरिट तेलंगणा येथून आणून गोव्यात दारू बनविण्यासाठी नेण्याचा प्रयत्न होता.या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांना याबाबत अधिक माहिती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून गोवा ते तेलंगणा स्पिरिट वाहतुकीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न असून यात असणारे रॅकेट उघड करण्याचा प्रयत्न असल्याचे बांदा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी सांगितले.